मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता साबण आणि डिटर्जंट खरेदीसाठी मोजावे लागणार अधिक पैसे, वाचा सविस्तर

आता साबण आणि डिटर्जंट खरेदीसाठी मोजावे लागणार अधिक पैसे, वाचा सविस्तर

देशातील सर्वोच्च फास्ट मूव्हिंग कंझ्यूमर गुड्स (FMGC) कंपन्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि आयटीसी लिमिटेड  (ITC) ने साबण आणि डिटर्जंटसह काही ठराविक उत्पादनांवरील किमतीत वाढ केली आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: देशातील सर्वोच्च फास्ट मूव्हिंग कंझ्यूमर गुड्स (FMGC latest News) कंपन्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि आयटीसी लिमिटेड  (ITC) ने साबण आणि डिटर्जंटसह काही ठराविक उत्पादनांवरील किमतीत वाढ केली आहे. CNBC TV 18 च्या एका रिपोर्टनुसार, कंपनीने वाढत्या खर्चाचा हवाला देत या वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत. दोन दिवस आधी अशी देखील बातमी समोर आली होती की पार्ले (Parle) ने देखील बिस्किट आणि स्नॅक्सच्या किमती वाढवल्या आहेत.

व्हील डिटर्जंट आणि रिन बारच्या किमती वाढल्या

वृत्त वाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, HUL ने त्यांच्या व्हील डिटर्जंट पावडरच्या 1 किलो पॅकची किंमत 3.4 टक्क्यांनी वाढवली आहे. यामुळे आता हा पॅक एकूण 2 रुपयांनी महाग होणार आहे. कंपनीने व्हील पावडरच्या 500 ग्रॅम पॅकची किंमत 2 रुपयांनी वाढवून ती 28 रुपयांवरून 30 रुपयांपर्यंत वाढवली आहे.

HUL ने त्यांचे उत्पादन Rin Bar च्या 250 ग्रॅम पॅकच्या किंमतीत 5.8 टक्क्यांनी वाढ केली आहे. लक्स साबणाच्या किमती 21.7 टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. तर आता याचा 100 ग्रॅमचा मल्टीपॅक 25 रुपयांनी महाग झाला आहे.

हे वाचा-Special Story: कोणत्या बँकेचं Education Loan तुमच्यासाठी सर्वांत योग्य? वाचा

आयटीसीने वाढवले साबण आणि डिओडरेंटचे दर

आयटीसीने कथित स्वरुपात फियामा साबणाचे (Fiama soap) दर 10 टक्के तर विवेल च्या 100 ग्रॅम पॅकसाठी 9 टक्क्यांची वाढ केली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीने एंगेज डिओडरेंट (Engage deodorant) च्या 150 मिली बॉटलच्या किमतीत 7.6 टक्के आणि 120 ML बॉटलच्या किमतीत 7.1 टक्क्यांची वाढ केली आहे.

आयटीसीच्या प्रवक्त्यांनी सीएनबीसी टीवी 18 शी बातचीत करताना अशी माहिती दिली की, 'इनपूट खर्चात मोठी वाढ झाली आहे आणि इंडस्ट्रीने किमतीत वाढ केली आहे.' हे लक्षात घेऊन कंपनीने निवडक वस्तूंच्या किमतीत बदल केला आहे. हा निर्णय घेताना त्याचा संपूर्ण बोजा ग्राहकांवर पडणार नाही याची काळजी कंपनीने घेतल्याचे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

First published:

Tags: Money