मुंबई, 25 डिसेंबर : HP Adhesives शेअर्सच्या लिस्टिंगची तारीख (HP Adhesives share listing date) जवळ येत आहे. BSE वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, HP Adhesives चे शेअर्स 27 डिसेंबर 2021 रोजी BSE आणि NSE वरील T' ग्रुप ऑफ सिक्युरिटीजच्या यादीमध्ये लिस्ट केले जातील. दरम्यान, ग्रे मार्केटमधून (Gray Market) असे संकेत मिळत आहेत की सोमवार 27 डिसेंबर रोजी, HP Adhesives च्या शेअर्सच्या लिस्टमध्ये वाढ दिसू शकते.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, HP Adhesives चे शेअर्स सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये 80 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 65 रुपयांपेक्षा हे 15 रुपये अधिक आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, गेल्या एका आठवड्यापासून ग्रे मार्केटमध्ये HP Adhesives च्या शेअरची किंमत 60 ते 90 रुपयांच्या दरम्यान आहे.
तज्ज्ञांनी पुढे म्हटलं की, गेल्या आठवड्यात IPO मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स दिसून आल्याने HP Adhesives ला ग्रे मार्केट प्रीमियम कायम ठेवण्यास मदत झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, ग्रे मार्केट प्रीमियम हे संकेद देत आहे की सोमवारी HP Adhesives च्या शेअर्सची मध्यम लिस्टिंग दिसून येईल.
'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळ गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर
GMP चा अर्थ काय?
बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, जीएमपीमुळे अंदाज येतो की अनलिस्टेड मार्केटमध्ये इश्यू किती रुपयांची लिस्ट अपेक्षित आहे हे सांगते. HP Adhesives च्या बाबतीत, त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम सध्या 80 रुपये आहे. याचा अर्थ असा की ग्रे मार्केटला अपेक्षित आहे की HP Adhesives ची लिस्टिंग 354 (274 + 80), जे त्याच्या 274 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या वरच्या किंमत बँडपेक्षा जवळपास 30 टक्के जास्त आहे.
टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज एक चांगला पर्याय! वर्षाला होऊ शकते दीड लाखांची बचत
HP Adhesives Limited ची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) 15 ते 17 डिसेंबर पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुली होती आणि 20.96 वेळा बुक करण्यात आली होती. ऑफरवर असलेल्या 25,28,500 शेअर्सच्या तुलनेत 5,29,89,650 शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. 45,97,200 इक्विटी शेअर्सच्या इनिशियल शेअर सेल फॉर प्राईज बँड रुपये 262-274 प्रति शेअर होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market