Home /News /money /

आता PF Account मधून तुम्ही काढू शकता Advance रक्कम, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

आता PF Account मधून तुम्ही काढू शकता Advance रक्कम, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

महाराष्ट्रातून 25 मार्च ते 31 ऑगस्ट आणि त्यानंतर 7,23,986 कर्मचाऱ्यांनी जवळपास 8,968.45 कोटी रुपये पीएफ अकाऊंटमधून काढले आहेत.

    नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : कोरोना व्हायरसदरम्यान केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना Employee Provident Fund (EPF) मधून एडव्हान्स रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. लॉकडाऊनमध्ये लोकांना पैशांची चणचण भासू नये यासाठी सरकारने ही सूट एका निश्चित वेळेपर्यंत दिली होती. केंद्र सरकारकडून नियमांमध्ये सूट देण्यात आल्यानंतर, EPFO कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला होता. 44 हजार कोटीहून अधिक रक्कम काढण्यात आली EPFOकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 38,71,664 लोकांनी 44,054.72 कोटी रुपये या खात्यातून काढले आहेत. महाराष्ट्रातून 25 मार्च ते 31 ऑगस्ट आणि त्यानंतर 7,23,986 कर्मचाऱ्यांनी जवळपास 8,968.45 कोटी रुपये पीएफ अकाऊंटमधून काढले आहेत. आता 1 सप्टेंबरनंतर पीएफ अकाऊंटमधून PF Account ऍडव्हान्स रक्कम काढण्यासाठी सरकारकडून देण्यात आलेली सूट संपली आहे. या स्किमअंतर्गत आता पीएफ अकाऊंटमधून पैसे काढता येऊ शकत नाहीत. परंतु कर्मचाऱ्यांकडे अजूनही पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्याचा पर्याय आहे. हा पर्याय सरकारद्वारा ऍडव्हान्स विड्रॉल स्किमअंतर्गत असणार नाही. हे वाचा - JEE Advanced Result 2020: असा चेक करा जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाणून घ्या पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी काय आहे प्रोसेस - - पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी EPFOच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करावं लागेल. UAN क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगइन करता येतं. यासाठी पीएफ अकाऊंट आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. - या पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर Online Serviceवर क्लिक करा आणि Claim (Form-31, 19 & 10C) हा पर्याय निवडा. - त्यानंतर बँक अकाऊंट नंबर टाकून Verifyवर क्लिक करा. त्यानंतर Yes वर क्लिक करुन Proceed For Online Claim वर जा. - पैसे ऑनलाईन काढण्यासाठी PF Advance (Form 31) पर्याय निवडा. येथे पैसे काढण्यासाठीचं कारण सांगावं लागेल. कारण सांगितल्यानंतर आणि कर्मचाऱ्याचा पत्ता भरल्यानंतर अर्ज करा. - पैसे काढण्यासाठी जे कारण सांगितलं आहे, त्यासंबंधी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी सबमीट करावी लागेल. EPF अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याला आपल्या कंपनीतून मंजूरी घ्यावी लागेल. - त्यानंतर पैसे अकाऊंटमध्ये जमा होतील. याबद्दल रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर होण्यासाठी काही कालावधी लागतो.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: PF Withdrawal

    पुढील बातम्या