ITR भरल्यानंतर पासवर्ड विसरलात तर लाॅग इन न करता 'असं' करा व्हेरिफिकेशन

ITR भरल्यानंतर पासवर्ड विसरलात तर लाॅग इन न करता 'असं' करा व्हेरिफिकेशन

Income Tax Return - तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलात आणि पासवर्ड विसरलात तर काय कराल?

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर व्हेरिफाय करावा लागतो. जोपर्यंत तुम्ही ITR व्हेरिफाय करत नाही तोपर्यंत टॅक्स रिटर्न पूर्ण होत नाही.

का आहे आवश्यक?

ITR भरल्यानंतर व्हेरिफाय नाही केला तर तुम्ही रिटर्न भरलाय हे मानलं जाणार नाही. तुमचा रिटर्नही तुम्हाला परत मिळणार नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तुम्हाला नोटिसही येऊ शकते.

आधार कार्डाच्या मदतीनं 'अशी' बुक करा ट्रेनची तिकिटं, 'असा' होतो फायदा

आयटीआर फाइल करण्यासाठी 120 दिवसांच्या आत ते व्हेरिफाय करावं लागतं. तरच ते स्वीकारलं जातं. तुम्ही 120 दिवसांनंतर व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली तर तुम्हाला रिटर्न फाइल करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला लेट फी द्यावी लागेल.

काय आहे पद्धत?

ऑनलाइन आयटीआर व्हेरिफिकेश तुम्ही OTP किंवा EVC द्वारे करू शकता. किंवा रिटर्न फाइल केल्यानंतर 120 दिवसांच्या आत रिटर्न बंगळुरूच्या टॅक्स डिपार्टमेंटच्या सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटरवर पोस्ट करू शकता.

महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आयटीआर फाइल केल्यानंतर तुम्ही पासवर्ड विसरलात तर लाॅगइन न करता तुम्ही रिटर्न व्हेरिफाय करू शकता.

घरी ठेवलेल्या सोन्यातून करा मोठी कमाई, 'ही' आहे SBI ची स्कीम

लाॅग इन न करता व्हेरिफिकेशन असं करा

www.incometaxindiaefiling.gov.in वर क्लिक करा.

Quick links टॅबच्या खाली दिलेला e-verify return पर्याय निवडा

त्यानंतर तुमचा पॅन, Assessment Year आणि अॅक्नाॅलेजमेंट नंबर भरून Continue वर क्लिक करा.

तुम्ही वेळेत रिटर्न भरला तर तो रिवाइज करण्यासाठी तुमच्याकडे बराच वेळ असतो. रिविजन करायचा असेल तर रिटर्न वेरिफाय करू नका. नाही तर मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लगेच प्रोसेसमध्ये टाकतो. म्हणून रिविजन करायची संधी ठेवा. म्हणजे तुम्ही चुका सुधारू शकता आणि तुम्हाला दंड पडणार नाही.

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातल्या किमती

ITR रिवाइज कसा करायचा?

तुम्ही ITR ऑनलाइन भरला असाल तर तुम्हाला रिवाइज्ड फाॅर्ममध्ये रिटर्न भरल्याचा अॅकनाॅलेजमेंट नंबर आणि रिटर्न भरला असल्याची तारीख फाॅर्ममध्ये भरा. तुम्ही दुसऱ्यांदा रिवाइज करत असाल तर पहिलाच नंबर आणि तारीख भरावी लागेल. तुम्ही ऑफलाइनही भरू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला 15 अंकी अॅकनाॅलेजमेंट नंबर पाठवतं.

ऑनलाइन रिटर्न वेरिफाय नेटबँकिंग किंवा आधार ओटीपीसह केला जातो. त्यातली चूक सुधारली की तुम्ही निश्चिंत राहता.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आता 31 ऑगस्ट 2019 आहे. या महिन्यात ITR भरण्याची घाई करावी लागेल. पण त्या घाईत काही गोष्टी तुम्ही रिटर्नमध्ये दाखवल्या नाहीत तर नक्की अडचणीत याल.

हल्ली अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. एका म्युच्युअल फंडातून दुसरीकडे जाताना  म्युच्युअल फंडातून जे पैसे मिळतात ते दाखवायचं अनेकदा राहून जातं. ते दाखवणं आवश्यक आहे.

ITR फाइल करताना सेव्हिंग अकाउंट आणि एफडीमधून मिळणारं व्याजही दाखवावं लागतं. त्याचाही हिशेब द्यावा लागतो.

तुम्ही तुमच्या छोट्यांच्या नावे केलेली गुंतवणूक एका वर्षात 1500 रुपयांपर्यंत करमुक्त आहे. पण ती या रकमेच्या पुढे जात असेल तर मग ITR मध्ये दाखवावी लागेल.

VIDEO: हनी ट्रॅपच्या प्रकरणात भर रस्त्यात तरुणाला काठ्यांनी मारलं!

Published by: Sonali Deshpande
First published: August 13, 2019, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading