मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Credit Card वापरताना करु नका निष्काळजीपणा.. नाहीतर होईल मोठं नुकसान; असा करा योग्य वापर

Credit Card वापरताना करु नका निष्काळजीपणा.. नाहीतर होईल मोठं नुकसान; असा करा योग्य वापर

क्रेडिट कार्डचा व्यवस्थित वापर न केल्यास काय तोटे होऊ शकतात, याची माहिती घेऊ या. 'झी बिझ'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

क्रेडिट कार्डचा व्यवस्थित वापर न केल्यास काय तोटे होऊ शकतात, याची माहिती घेऊ या. 'झी बिझ'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

क्रेडिट कार्डचा व्यवस्थित वापर न केल्यास काय तोटे होऊ शकतात, याची माहिती घेऊ या. 'झी बिझ'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर:  क्रेडिट कार्ड (Credit Card) हे अनेकांसाठी एखाद्या वरदानासारखंच काम करतं. कारण अशा अनेक गोष्टी असतात, की ज्यासाठी कर्ज घेता येत नाही आणि त्यासाठी आपल्याकडे तातडीने पैसेही उपलब्ध नसतात; मात्र थोड्या दिवसांत आपण ते उभे करू शकणार असतो. अशा वेळी क्रेडिट कार्ड कामी येतं. त्यातून आपण आपली गरज तातडीने भागवू शकतो. शिवाय जे पैसे आपल्याला वापरायला मिळाले, त्यांच्या परतफेडीसाठी 40-45 दिवसांपर्यंत व्याजही द्यावं लागत नाही. एखाद्या आरोग्यविषयक किंवा अन्य इमर्जन्सीच्या वेळेसही क्रेडिट कार्ड एखाद्या जवळच्या व्यक्तीसारखं उपयोगी पडतं. क्रेडिट कार्डच्या उपयुक्ततेमुळेच त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्ती आता मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित नाहीत. अगदी छोट्या शहरांमध्येही अनेक जण क्रेडिट कार्ड्स वापरतात; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो वाईट असतो. त्याला क्रेडिट कार्ड्सही अपवाद नाहीत.

क्रेडिट कार्ड हे उत्पन्नवाढीचं साधन नव्हे, तर ती पैसे काही दिवस वापरायला मिळण्याची सुविधा आहे, हे अनेक जण विसरतात. म्हणूनच 'अंथरूण पाहून पाय पसरावेत' ही म्हण क्रेडिट कार्ड वापरतानाही कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या परतफेडीच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च क्रेडिट कार्डवरून केल्यास ते आपल्या अंगाशी येऊ शकतं आणि मग क्रेडिट कार्डचं वरदान शापात रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. क्रेडिट कार्डचा व्यवस्थित वापर न केल्यास काय तोटे होऊ शकतात, याची माहिती घेऊ या. 'झी बिझ'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

ठरलेल्या मुदतीत क्रेडिट कार्डचं बिल (Credit Card Bill Payment) भरलं गेलं नाही, तर त्यावर मोठ्या दराने व्याज आकारलं जातं. दर दिवशी त्यात भर पडत जाते. मासिक तीन टक्क्यांसह 30 ते 36 टक्के वार्षिक एवढा व्याजदर त्यावर आकारला जाऊ शकतो. म्हणजेच जे पैसे आपल्याला व्याजमुक्त वापरायला मिळाले, त्यावर भरभक्कम व्याज द्यावं लागू शकतं. हे आपल्या आवाक्याच्या बाहेरच जातं.

हेही वाचा-  PM Kisan: खूशखबर! शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर

 क्रेडिट कार्ड घेताना कोणीही त्याबद्दलच्या टर्म्स अँड कंडिशन्स (Terms & Conditions) अर्थात अटी आणि शर्ती बारकाईने वाचत नाही. वास्तविक त्या वाचणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळा त्यात छुपे चार्जेस अंतर्भूत असतात, जे प्रत्यक्ष बिल हातात पडेपर्यंत ग्राहकाला कळतच नाहीत. तसंच, केवळ आठवड्याची मुदत देऊन बँक व्याजदर वाढवू किंवा कमी करू शकते. अशा अनेक गोष्टींबद्दल ग्राहकाने क्रेडिट कार्ड घेतानाच माहिती करून घेतलं पाहिजे.

क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरलं गेलं नाही, तर ग्राहक कर्जाच्या जाळ्यात (Loan) अगदी अलगद अडकत जातो. कारण वेळेत बिल भरलं नाही, तर अतिरिक्त व्याजदरासह अनेक चार्जेस आकारले जात असतात. मुदत उलटून गेल्यानंतर जोपर्यंत बिल भरलं जात नाही त्या प्रत्येक दिवसाचं व्याज आकारलं जातं. त्यामुळे बिलाचा आकडा खूपच मोठा होत जातो.

हेही वाचा-  विदेशी ब्रोकर्सनी वाढवलं या 6 स्टॉक्सचं टार्गेट, तुमच्याकडे आहे का यापैकी कोणता शेअर?

क्रेडिट कार्डचं लिमिट (Credit card Limit) जास्त असेल, तर काही जण बिनदिक्कतपणे वाट्टेल तेवढी खरेदी करतात. गरजेच्या नसलेल्या वस्तूही खरेदी केल्या जातात; मात्र त्यामुळे बिल भरण्याच्या वेळेस ब्रह्मांड आठवू शकतं. बिल थकलं तर मग बघायलाच नको. म्हणूनच क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना या गोष्टीचं भान ठेवायला हवं.

हेही वाचा-  Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरला ICICI Securities पॉझिटिव्ह रेटिंग, 300 रुपयांहून कमी किमतीचा स्टॉक

 क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरलं गेलं नाही, तर सिबिल स्कोअर खराब होतो. त्यामुळे दुसऱ्या बँकांची कर्जं मिळायलाही अडचण निर्माण होते. बँकेला कर्जदाराच्या कर्ज इतिहासाची (Loan History) माहिती सिबिल स्कोअरवरून (Cibil Score) कळते. त्याने आधी कर्ज घेतलं आहे का? असल्यास त्याची परतफेड केली आहे का किंवा नियमितपणे करत आहे का, याची खात्री या सिबिल स्कोअरद्वारे केली जाते. त्यामुळे आजकाल कर्ज देताना बँका आधी सिबिल स्कोअर तपासतात. हा सिबिल स्कोअर चांगला असेल तरच कर्ज मिळू शकतं. त्यामुळे कर्ज घ्यायचं असेल तर सिबिल स्कोअर चांगला असणं अत्यावश्यक आहे. ती बाब क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरण्यावर अवलंबून आहे.

First published:

Tags: Credit card, Personal finance