कार इन्शुरन्स ऑनलाइन अपडेट करणं एकदम सोपं, 'या' आहेत 5 स्टेप्स

कार इन्शुरन्स ऑनलाइन अपडेट करणं एकदम सोपं, 'या' आहेत 5 स्टेप्स

भारतात Car Insurance शिवाय ड्राइव्ह करणं हे Motor Vehicle Act, 1988 प्रमाणे गुन्हा आहे. त्याला शिक्षा होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 10 जून : भारतात Car Insurance शिवाय ड्राइव्ह करणं हे Motor Vehicle Act, 1988 प्रमाणे गुन्हा आहे. त्याला शिक्षा होऊ शकते. अनेकदा आपण कार इन्शुरन्स एक्सपायर होईपर्यंत वाट पाहतो. त्यानंतर अपडेट करायला उशीर करतो.

कार इन्शुरन्सशिवाय ड्राइव्ह करणं म्हणजे जणू संकटालाच आमंत्रण देणं. दरम्यान, तुमच्या सोबत कुठली दुर्घटना घडली, कारला अपघात झाला तर इन्शुरन्स कंपनी तुमचा इन्शुरन्स वैध मानणार नाही. म्हणून तो अपडेट करणं आवश्यक आहे.

मोदी सरकारच्या 'या' मंत्रालयाचे अधिकारी,कर्मचारी आता कुणाला भेटू शकणार नाहीत

हल्ली इन्शुरन्स रिन्यू करणं सोपं काम आहे. तुम्ही हे काम ऑनलाइनही करू शकता. त्यासाठी आहेत 5 स्टेप्स. त्या पुढीलप्रमाणे -

Union Budget 2019 : बँकेतून 'इतके' पैसे काढण्यावर लागू शकतो कर

तुमची इन्शुरन्स कंपनी निवडा

तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी निवडा. तुम्ही अगोदर जी कंपनी निवडली असेल तीच रिन्युअलच्या वेळी असावी, असं सक्तीचं नाही. तुम्ही रिन्युअलच्या वेळी कंपनी बदलू शकता. दुसऱ्या कंपनीची आॅफर स्वीकारू शकता.

तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या इन्शुरन्सची किंमत आणि कव्हरेज तपासा. तशी सेवा मिळाली का ते पाहा. नंतर तुम्ही कुठल्याही इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन कारचे डिटेल्स भरून दुसऱ्या पाॅलिसीच्या आॅफरबद्दल पाहा.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत FD पेक्षा लवकर दुप्पट होतात पैसे, 'अशी' करा गुंतवणूक

डिटेल्स भरा

कार इन्शुरन्सच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही कारची डिटेल्स भरा. कारचा इन्शुरन्स प्रीमियम तुमच्या कारचं माॅडेल, लोकेशन्सवर अवलंबून असतो. पाॅलिसी खरेदी करायची असेल तर डिटेल्स भरा. जुनी पाॅलिसी रिन्यू करायची असेल तर हे डिटेल्स द्यावे लागणार नाहीत. तुमच्या वेबसाइटवर आधीच हे डिटेल्स असतात.

तुमचा प्लॅन निवडा

तुम्हाला Comprehensive Car Insurance Policy निवडण्याचा सल्ला दिला जातो आणि तुम्हीही ही पाॅलिसी घ्या. यात थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर मिळतं. याशिवाय तुम्हाला अपघात, संकट, चोरी यासाठीही इन्शुरन्स मिळतो. तुम्ही या पाॅलिसीचे Add-on Covers घेऊ शकता.

आॅनलाइन पेमेंट करा

याचं पेमेंट तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आॅनलाइन वाॅलेट्स असे अनेक प्रकार आहेत. तुमचा नवा इन्शुरन्स तुमच्या रजिस्टर्ड ई मेलवर पाठवला जाईल.

एकदा कागदपत्रं तपासून पाहा

पाॅलिसी रिन्यू झाल्यानंतर तुम्ही कागदपत्रं तपासून पाहा. त्याची साॅफ्ट काॅपीही वैध आहे. पाॅलिसी किंवा कारच्या डिटेल्समध्ये काही गडबड तर नाही ना ते पाहून घ्या. असेल तर बदल करता येईल.

VIDEO : विधानसभेसाठी आठवलेंनी दिली प्रकाश आंबेडकरांना ऑफर, म्हणाले...

First published: June 10, 2019, 6:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading