सोप्या पद्धतीनं ट्रान्सफर होतं LPG कनेक्शन, जाणून घ्या प्रक्रिया

जेव्हा घराचा पत्ता बदलतो, तेव्हा गरजेच्या गोष्टी ट्रान्सफर कराव्या लागतात. आम्ही तुम्हाला सांगतोय की घरचा पत्ता बदलला तर गॅस कनेक्शन कसं ट्रान्सफर करायचं.

News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2019 12:41 PM IST

सोप्या पद्धतीनं ट्रान्सफर होतं LPG कनेक्शन, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई, 06 एप्रिल : अनेकदा आपण आपलं राहतं घर बदलतो. नवं घर घेतो. जेव्हा घराचा पत्ता बदलतो, तेव्हा गरजेच्या गोष्टी ट्रान्सफर कराव्या लागतात. आम्ही तुम्हाला सांगतोय की घरचा पत्ता बदलला तर गॅस कनेक्शन कसं ट्रान्सफर करायचं.

तुम्ही त्याच भागात शिफ्ट झालात

तुम्ही ज्या भागात राहता, तिथेच नव्या घरात शिफ्ट झालात, तर तुम्ही तुमच्या वितरकाशी संपर्क करा. तुम्हाला एक फाॅर्म भरावा लागेल. त्यावर नव्या घराचा पत्ता द्यावा लागेल. सोबत प्रमाणपत्रही. याव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही द्यावं लागणार नाही कारण तुमच्या गॅस एजन्सीकडे तुमची माहिती अगोदरच असते.

तुम्ही शहर बदललं

तुम्ही वेगळ्या शहरांत शिफ्ट झालात तर गॅस कनेक्शनची प्रक्रिया वेगळी आहे. तुम्हाला जुन्या एजन्सीकडे जाऊन सब्सक्रिप्शन वाऊचर, डोमेस्टिक गॅस कंझ्युमर कार्ड, ट्रान्सफर सब्सक्रिप्शन वाऊचर सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावे लागतील. त्यानंतर वितरक तुम्हाला टर्मिनल वाऊचर तयार करून देईल. तुम्ही दुसऱ्या शहरात जाल तेव्हा तुम्हाला जवळच्या एजन्सीशी संपर्क साधावा लागेल. तुमचं टर्मिनल वाऊचर आणि नव्या घराचा पत्ता द्यावा लागेल. चौकशी पूर्ण जाल्यानंतर नवी गॅस एजन्सी तुम्हाला रेग्युलेटर आणि गॅस सिलेंडर देईल.

Loading...

तुम्ही सिलेंडर जमा केलंत की जुनी गॅस एजन्सी तुमचे सिक्युरिटी पैसे परत करेल. नव्या एजन्सीकडे तुम्हाला पुन्हा सिक्युरिटी पैसे भरावे लागतील.

गॅस एजन्सी बदलायची असेल

तुम्हाला हवं तर तुम्ही वितरक बदलू शकता.  त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. वितरक बदलण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जुन्या वितरक आॅफिसमध्ये जाऊन मिळालेले सब्सक्रिप्शन वाऊचर जमा करावं लागेल. इथे तुम्हाला टर्मिनल वाऊचर मिळेल. त्यावर तुम्हाला नवा पत्ता भरावा लागेल. वाऊचरला पूर्ण भरून जुना वितरक स्टँप लावून द्यावं लागेल.

टर्मिनल वाऊचर इथून नव्या गॅस एजन्सीकडे जातं आणि चार-पाच दिवसात पत्ता बदलेल. ग्राहकांना नव्या एजन्सीकडून नव्या कंझ्युमर नंबरसोबत डोमेस्टिक गॅस कंझ्युमर कार्ड मिळतं.

ही कागदपत्रं आवश्यक

पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड अपडेट करावं लागेल. पत्ता बदलल्यावर आधार कार्डही अपडेट करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्राची गरज लागणार नाही. आधार व्यतिरिक्त टेलिफोनचं बिल, विजेचं बिल, मतदार आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुकाची झेराॅक्स, पासपोर्ट ही कागदपत्रं गरजेची आहेत.


VIDEO: नववर्षाचा जल्लोष; उर्मिला मातोंडकर यांनी लेझीमच्या तालावर धरला ठेका


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...