मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Financial Management: फक्त शिक्षणच नाही मुलांना शिकवा आर्थिक व्यवस्थापन; फॉलो करा ‘या’ 7 सोप्या टिप्स

Financial Management: फक्त शिक्षणच नाही मुलांना शिकवा आर्थिक व्यवस्थापन; फॉलो करा ‘या’ 7 सोप्या टिप्स

Financial Management: फक्त शिक्षणच नाही मुलांना शिकवा आर्थिक व्यवस्थापन; फॉलो करा ‘या’ 7 सोप्या टिप्स

Financial Management: फक्त शिक्षणच नाही मुलांना शिकवा आर्थिक व्यवस्थापन; फॉलो करा ‘या’ 7 सोप्या टिप्स

Financial Management to children: बालवयातच बचत आणि आर्थिक नियोजनाचे धडे दिले गेल्यास भविष्यात त्यांना कुठलीही अडचण त्रास देणार नाही आणि ते मुलं स्वावलंबी होऊ शकतील.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 सप्टेंबर: मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी प्रत्येक पालक सतत झटत असतो. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण देताना पाल्यांना आर्थिक शिक्षणं देणंही सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचं झालंय. बालवयातच बचत आणि आर्थिक नियोजनाचे धडे दिले गेल्यास भविष्यात त्यांना कुठलीही अडचण त्रास देणार नाही आणि ते मुलं स्वावलंबी होऊ शकतील.

महागाई वाढत असताना दैनंदिन खर्च भागवताना बहुतांश पालक मुलांच्या भविष्याचा विचार करून ठराविक रक्कम त्यांच्या नावावर फिक्स डिपॉझिट करतात. पण मूल मोठ झालं की, आपोआप आर्थिक साक्षर होईल हा विचार करून मुलांना आर्थिक नियोजनाचे धडे देण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आर्थिक साक्षरतेचं महत्त्व जोपर्यंत मुलांना सांगितलं जाणार नाही, तोपर्यंत ते शिकण्यासाठी मुलंही पुढाकार घेणार नाहीत. पैशांची नियोजन कसं करायला हवं हे बालवयातचं मुलांना सांगितलं जाणं आवश्यक आहे. सध्याच्या जगात आर्थिक साक्षरता हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलाय. किशोरवयीन मुलं स्वकमाईच्या आधारे उत्तम जीवनशैली जगण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. बुद्धीचा वापर करून आवश्यक त्या गोष्टींसाठी पैसे खर्च करणं म्हणजेच आर्थिक साक्षरता नव्हे, तर बचत आणि गुंतवणुकीची सवय असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

अनेक शाळा सध्या पायाभूत शिक्षण देण्यासह विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे धडे देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. वित्त आणि अर्थव्यवस्था नेमकी कशाप्रकारे काम करते हे जाणून घेण्यासाठी शाळांमध्ये आर्थिक साक्षरतेच्या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केलाय. शाळांमध्ये हा उपक्रम सुरू असला तरी पालक म्हणून आपण मुलांना पैशाचं महत्त्व आणि बुद्धिचातुर्याने पैसे नेमके कुठे खर्चायला हवेत याचे धडे देणं आवश्यक बनलं आहे. पालकांनी मुलांना आर्थिक शिक्षण देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्यापैकी निवडक बाबींवर खालीलप्रमाणे विचार केला जाऊ शकतो.

आर्थिक नियोजन करताना मुलांना सहभागी करावं-

 कुटुंबामध्ये आपण जर एखादी महागडी वस्तू आणणार असू किंवा खरेदीसाठी बाजारात जातो तेव्हा मुलांचं मत आवर्जून जाणून घ्यावं. यातून मुलं आर्थिक बाबतीत निर्णय घेताना जागरूक राहतील आणि भविष्यात विचार करून खर्च करण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होईल.

मुलांना पिगी बँक द्या-

मुलांना पैसे जमा व खर्च करण्यासाठी दोन पिगी बँक द्या. एकात मुलाने पैसे जमा करत राहावेत आणि दुसऱ्या पिगी बँकेतील पैसे त्याने आवश्यकतेनुसार खर्च करावेत, असा सल्ला पालकांनी द्यावा. असं केल्याने मुलांजवळ बचतीचे पैसे शिल्लक राहतील आणि खर्च करताना तो गरज असेल तिच वस्तू घेण्याचा प्रयत्न करेल.

गरज आणि इच्छेतील फरक समजून सांगा-

 कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि कुठली वस्तू घेण्याची इच्छा आहे यातील फरक समजावण्यात पालक यशस्वी ठरले तर मुलं निश्चितच योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतील. कुटुंबात राहताना पालक अन्नधान्य, निवारा आणि औषधं अशा जीवनावश्यक गोष्टींवर खर्च केल्यानंतर कपडे, दागदागिने, खेळणी, पर्यटन अशा चैनीच्या गोष्टींचा विचार करतात. आवश्यक गरजांची पूर्तता झाल्यानंतर बाकी बाबींचा विचार व्हायला हवा, ही शिकवण आपण मुलांना यातून देऊ शकतो.

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ समजून सांगा-

मुलांना आर्थिक नियोजनाचे धडे देत असताना प्रत्येक लहानसहान गोष्टीबद्दल सांगायला हवं. महिन्याच्या खर्चाची यादी करताना मुलांना यात सहभागी करून घ्या. यातूनच मुलांना बँक अकाउंटच्या बाबतीतील प्राथमिक शिकवण मिळू शकते. आपलं उत्पन्न किती आणि खर्च काय याची माहितीही त्यांना यातून दिली जाऊ शकते. आलेलं उत्पन्न आणि होणारा खर्च वगळता जी रक्कम वाचेल ती बचतीत टाकायला हवी, असंही आपण मुलांना सांगू शकतो. या प्रक्रियेतून मुलांना भविष्यातील योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होऊ शकते.

योग्य ठिकाणी पैसे खर्च करण्यास सांगणं

 बहुतांश मुलांना त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती माहिती नसते, त्यामुळे अनावश्यक गोष्टींची ते मागणी करतात. अशावेळी पालक म्हणून एका वेळी एकच वस्तू आपण खरेदी करू शकतो हे मुलांना ठामपणे सांगितलं जाणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ किराणा सामान आणण्यासाठी आपण जेव्हा दुकानात जातो, त्यावेळी मुलांच्या आवडीच्या दोन वस्तू असतील तर त्यापैकी एकच गोष्ट निवडण्यासाठी सांगितलं जाणं गरजेचं आहे. खर्चाची मर्यादा मुलांना सांगून एक गोष्ट निवडण्यास सांगितल्यानंतर प्राधान्याने कुठली वस्तू महत्त्वाची आहे हे निवडण्याचं कौशल्य मुलांमध्ये विकसित होईल. भविष्यात आर्थिक निर्णय घेताना ही बाब मुलांसाठी फायदेशीर ठरू शकते.

पैशांत नेमकी कशी वाढ होते याची शिकवण द्यायला हवी

 अनेकदा आपण पैशांची बचत कशी करावी याबद्दल मुलांना सांगत असतो. पण बचतीच्या पैशांत वृद्धी कशी करता येईल याबद्दल खूप कमी वेळा बोलले जाते. बालवयातच मुलांचं बँकेत बचत खातं उघडावं. या खात्यामध्ये दर महिन्याला थोडीफार रक्कम टाकण्याचा सल्ला त्यांना द्यावा. बचत खात्यात जमा रकमेवर कशा पद्धतीने बँक व्याज देते. ही बाबही मुलांना समजून सांगावी यातून पैशांमध्ये स्वतःहून वाढ कशी होते याची माहिती मुलांना मिळू शकेल. किशोरवयीन मुलांना फिक्स डिपॉझिटबद्दल माहिती द्यावी. महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड याबद्दल अवगत केले तर ते अधिक आर्थिक साक्षर होऊ शकतील. मुलांची आवड आणि शिकण्याची क्षमता यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. परंतु आर्थिक साक्षरतेतून या क्षेत्रामध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमात प्रवेश देऊन करिअर करण्याच्या दृष्टीने विचार केला जाऊ शकतो.

मुलांना प्रत्यक्ष व्यवहार शिकवावा

मुलांना कुटुंबाकडून मिळणाऱ्या पैशांची बचत करण्याची सवय लावायला हवी. त्यासाठी दोन पिगी बँक तयार करण्याचा सल्ला त्यांना द्यावा. कुटुंबाकडून मिळणारे पैसे दोन्ही पिगीबँकमध्ये समान पद्धतीने जमा करावेत. मुलाला त्याच्या आवडीची एखादी वस्तू घ्यायची असेल तर खर्चाच्या पिगीबँकमधून पैसे घेण्यास सांगावे व आवश्यक ठिकाणी खर्च करायचा असल्यास दुसऱ्या पिगीबँकमधील पैसे घेण्याचा सल्ला त्यांना द्यावा. यातून मुलांना कुठल्या वस्तूसाठी किती पैसे जमा करावे लागणार आहेत याचं ज्ञान मिळू शकतं.

केवळ मोठी व्यक्तीच आर्थिक साक्षर असायला हवी असं एकंदरीत मानलं जातं. मोठ्यांप्रमाणे मुलांनाही आर्थिक साक्षर केलं जाणं महत्त्वाचं आहे. असे X Capital च्या संचालिका गरिमा कौशल सांगतात. मुलांना आर्थिक साक्षर केल्यानंतर भविष्यात त्यांचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो असेही त्यांचं म्हणणं आहे.

मॅक्स लाइफचे फाउंडर एजंट जे. के. मेहता म्हणतात की, बालवयात शाळेत जाणाऱ्या मुलांना अंकगणित आणि चक्रवाढ व्याज शिकवले जाते, अशावेळी बचत आणि गुंतवणूक या महत्त्वाच्या बाबीही शिकवल्या जाणं गरजेचं आहे. सरकार शैक्षणिक मंडळ आणि नियमकांनी राष्ट्रीय धोरण अवलंबलं आहे. परंतु आर्थिक शिक्षणात याचा फायदा अद्याप मिळालेला नाही. यात आणखीन खूप काही करणं गरजेचं आहे.

बालवयात मुलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टीनं गुल्लक थेअरीचे सहसंस्थापक के. प्रल्हाद यांनी वरील विचार मांडले आहेत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते फार फायदेशीर ठरू शकतात.

First published:

Tags: Savings and investments, Small child