मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Pan Card: चुकूनही वापरू नका मृत व्यक्तीचं पॅन कार्ड, ‘या’ सोप्या पद्धतीनं करा सरेंडर

Pan Card: चुकूनही वापरू नका मृत व्यक्तीचं पॅन कार्ड, ‘या’ सोप्या पद्धतीनं करा सरेंडर

Pan Card: चुकूनही वापरू नका मृत व्यक्तीचं पॅन कार्ड, ‘या’ सोप्या पद्धतीनं करा सरेंडर

Pan Card: चुकूनही वापरू नका मृत व्यक्तीचं पॅन कार्ड, ‘या’ सोप्या पद्धतीनं करा सरेंडर

Pan Card Rule: एखाद्या व्यक्तीचे निधन झालं असेल तर त्याच्या पॅनकार्डचं काय करावं? याबाबत काही नियम आहेत का? आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 07 ऑगस्ट: आपल्याला दैनंदिन आयुष्य जगताना विविध कागदपत्रांची गरज भासते, मग ती सरकारी असो किंवा इतर कोणतीही कामं असो. आधार कार्डपासून ते इतर अनेक कागदपत्रं सोबत असणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुमची अनेक कामे अडकून पडतात. यापैकी एक कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड होय. जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बँकेत खाते उघडण्यापासून ते पैशाच्या व्यवहारापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याची गरज असते. पण तुम्हाला माहित आहे का की जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्याच्या पॅनकार्डचं काय होईल? याबाबत काही नियम आहेत का?  चला तर मग, आज आपण जाणून घेऊया की, नियमानुसार मृत व्यक्तीच्या पॅनकार्डचं (Pan card of dead person)  काय करायला हवं. पुढील स्लाइड्सवर तुम्ही याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. नियम आहे काय? (Pan Card Rule)- वास्तविक, भूतकाळातील अशा काही प्रकरणांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे, ज्यामध्ये मृत लोकांच्या पॅनकार्डवरून बँक आणि वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेण्यात आले होते. अशा प्रकारची फसवणूक तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आयकर विभागाचे काही नियम आहेत, ज्यांचं पालन करून तुम्ही मृत व्यक्तीचं पॅन कार्ड सुरक्षित करू शकता. आयकर विभागानं ठरवून दिलेल्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या नातेवाइकांना त्याचं पॅन कार्ड निष्क्रिय करावं लागेल किंवा सरेंडर करावं लागेल. हेही वाचा- EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा करायचा विलीन? फक्त 5 मिनिटांचं आहे काम, नंतर मिळेल मोठं व्याज तुम्ही या पद्धतीने पॅनकार्ड सरेंडर करू शकता (How to surrender Pan card after death?)- स्टेप 1- पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी, तुम्हाला प्रथम मूल्यांकन अधिकाऱ्याकडं अर्ज करावा लागेल. यामध्ये तुम्ही पॅन कार्ड का सरेंडर करत आहात याचं कारण द्यावं लागेल. स्टेप 2- त्यानंतर या अर्जात मृत व्यक्तीचं नाव, पॅन क्रमांक, जन्मतारीख, मृत्यू प्रमाणपत्राची प्रत भरण्यासोबतच ती जोडावी लागेल आणि शेवटी ती सादर करावी लागेल. फक्त त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा. यानंतर काही काळात मृत व्यक्तीचं पॅनकार्ड निष्क्रिय केलं जाईल.
First published:

Tags: Pan card, Pan card online

पुढील बातम्या