मराठी बातम्या /बातम्या /मनी /10 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल मोठी कमाई, सरकारकडूनही मिळेल सब्सिडी

10 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल मोठी कमाई, सरकारकडूनही मिळेल सब्सिडी

केवळ 10 हजार रुपयांत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय डेअरी फार्मिंगचा आहे. सध्याच्या काळात डेअरी फार्मिंग (Dairy farm) सर्वात चांगलं सेक्टर आहे, जिथे व्यवसाय वाढीची मोठी शक्यता आहे.

नवी दिल्ली, 7 जुलै : जर तुम्ही कमी गुंतवणुकीत तुमचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. केवळ 10 हजार रुपयांत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय डेअरी फार्मिंगचा आहे. सध्याच्या काळात डेअरी फार्मिंग (Dairy farm) सर्वात चांगलं सेक्टर आहे, जिथे व्यवसाय वाढीची मोठी शक्यता आहे. हे एक असं सेक्टर आहे, जिथे मंदीचा फारसा फरक पडत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो आणि केंद्र आणि राज्य सरकारही पशुपालनासाठी लोन आणि सब्सिडीची सुविधा देतात. अशात डेअरी सुरू करुन तुम्ही दररोज चांगली कमाई करू शकता.

कसा सुरू कराल व्यवसाय?

डेअरी फार्मिंग सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या काळात गायी-म्हशी घ्याव्या लागतील. त्यानंतर मागणीनुसार यात वाढ करता येते. यासाठी गीर जातीसारख्या चांगली जातीची गाय विकत घ्यावी लागेल आणि तिची चांगली काळजी घ्यावी लागेल. याचा फायदा म्हणजे अधिक प्रमाणात दुध प्रोडक्शन होऊ शकेल. त्यानंतर गायी-म्हशींची संख्या वाढवता येऊ शकते. तुमच्या नावे डेअरी फार्म सुरू करता येऊ शकतं.

छोट्या स्तरावर काम करण्यासाठी 2 गाय किंवा 2 म्हशीपासून डेअरीची सुरुवात करता येऊ शकते. दोघांसाठी 34 ते 40 हजार रुपयांपर्यंत सब्सिडी मिळू शकते.

(वाचा - डेअरी व्यवसायातून महिन्याला होईल 70 हजार कमाई, सरकारही करेल मदत; कसा सुरू कराल बिजनेस)

सरकार देईल 2.5 लाख रुपये सब्सिडी -

डेअरी उद्योगाला (Dairy industry) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने डेअरी उद्योजकता विकास योजना सुरू केली आहे. याचा उद्देश आधुनिक डेअरी तयार करणं आहे. तसंच शेतकरी आणि पशुपालक डेअरी फार्म (Dairy Farming) सुरू करुन आपलं उत्पन्न वाढवू शकतील. या योजनेसाठी बँकेतून कर्ज दिलं जातं. विशेष बाब म्हणजे या कर्जावर सब्सिडी मिळते. कृषी मंत्रालयाच्या DEDS योजनेत 2.5 लाख रुपयांची सब्सिडी मिळते. ही सब्सिडी नाबार्डकडून दिली जाते.

First published:
top videos

    Tags: Money, Start business