मराठी बातम्या /बातम्या /मनी /5 लाख रुपयांत सुरू करा व्यवसाय, दर महिन्याला होईल 70000 कमाई, मोदी सरकारही मदत करणार

5 लाख रुपयांत सुरू करा व्यवसाय, दर महिन्याला होईल 70000 कमाई, मोदी सरकारही मदत करणार

डेअरी प्रोडक्ट्स व्यवसाय करताना 5 लाखांची गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपये कमावता येऊ शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही मदत केली जाते.

डेअरी प्रोडक्ट्स व्यवसाय करताना 5 लाखांची गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपये कमावता येऊ शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही मदत केली जाते.

डेअरी प्रोडक्ट्स व्यवसाय करताना 5 लाखांची गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपये कमावता येऊ शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही मदत केली जाते.

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : देशात अनेक असे काही व्यवसाय आहेत, ज्याद्वारे कमी भांडवलात अधिक नफा कमावता येऊ शकतो. त्यापैकी एक डेअरी प्रोडक्ट्स हा व्यवसाय आहे. डेअरी प्रोडक्ट्स (Dairy Products) दररोज लागणाऱ्या वस्तू आहेत. डेअरी प्रोडक्ट्स व्यवसाय करताना 5 लाखांची गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपये कमावता येऊ शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही मदत केली जाते.

मुद्रा लोन -

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात आधी पैशांची गरज असते. परंतु मोदी सरकार पंतप्रधान मुद्रा लोन योजनेद्वारे पैशांची सुविधा उपलब्ध करत आहे. या व्यवसायासाठी सरकार पैशांसह प्रोजेक्टबाबतही संपूर्ण माहिती देते.

ज्यावेळी डेअरी प्रोडक्ट्स व्यवसाय सुरू कराल, त्यावेळी सरकार मुद्रा लोनद्वारे एकूण 70 टक्के रक्कम बँकेतून उपलब्ध करून देते. प्रोजेक्ट प्रोफाईलनुसार, या व्यवसायातील प्रोजेक्ट जवळपास 16 लाख 50 हजार रुपयांपर्यंत तयार करता येऊ शकतो. यात व्यवसाय सुरू करणाऱ्याला स्वत:ला 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रोजेक्टनुसार, या व्यवसायात वर्षाला 75 हजार लीटर फ्लेवर्ड मिल्कचा व्यवसाय होऊ शकतो. त्याशिवाय 36 हजार लीटर दही, 90 हजार लीटर बटर आणि 4500 किलोग्रॅम तूप बनवून व्यवसाय करता येऊ शकतो. त्यानुसार, जवळपास 82 लाख 50 हजार रुपयांचा टर्नओवर होऊ शकतो. ज्यात जवळपास 74 लाख रुपये कॉस्टिंग असेल. त्यापैकी 14 टक्के व्याज काढल्यानंतरही जवळपास 8 लाख रुपयांची बचत होऊ शकते.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असेल. ज्यात 500 स्क्वेअर फूट जागा प्रोसेसिंग जागा,150 स्क्वेअर फूट रेफ्रिजरेशन रूम, 150 स्क्वेअर फूट वॉशिंग एरिया, 100 स्क्वेअर फूट जागा ऑफिस आणि इतर सुविधांसाठी लागले.

First published:

Tags: Small business