मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बंद झालेलं PF Account कसं सुरू करायचं? जाणून घ्या Process

बंद झालेलं PF Account कसं सुरू करायचं? जाणून घ्या Process

नोकरदार वर्गासाठी प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) अर्थात भविष्य निर्वाह निधी हा महत्त्वपूर्ण असतो. दरमहा वेतनातून एक ठराविक रक्कम प्रॉव्हिडंट फंडात वर्ग केली जाते.

नोकरदार वर्गासाठी प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) अर्थात भविष्य निर्वाह निधी हा महत्त्वपूर्ण असतो. दरमहा वेतनातून एक ठराविक रक्कम प्रॉव्हिडंट फंडात वर्ग केली जाते.

नोकरदार वर्गासाठी प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) अर्थात भविष्य निर्वाह निधी हा महत्त्वपूर्ण असतो. दरमहा वेतनातून एक ठराविक रक्कम प्रॉव्हिडंट फंडात वर्ग केली जाते.

मुंबई, 28 मे : नोकरदार वर्गासाठी प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) अर्थात भविष्य निर्वाह निधी हा महत्त्वपूर्ण असतो. दरमहा वेतनातून एक ठराविक रक्कम प्रॉव्हिडंट फंडात वर्ग केली जाते. सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रॉव्हिडंट फंडातून मिळणारी रक्कम संबंधित कर्मचाऱ्याचा वृद्धापकाळातील आर्थिक आधार असते. त्यामुळे नोकरदार वर्गाला प्रॉव्हिडंट फंडाशी निगडीत प्रक्रिया आणि नियम माहिती असणं आवश्यक असतं. परंतु, माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीमुळे पीएफ अकाउंट बंद होतं. हे अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते.

तुम्ही ज्या कंपनीत पूर्वी काम करत होता, ती कंपनी बंद झाली आहे. तत्पूर्वी त्या कंपनीनं तुमचं पीएफ अकाउंट तुमच्या सध्याच्या म्हणजेच नव्या कंपनीकडे हस्तांतरित केलेलं नाही आणि त्यामुळे पीएफ अकाउंटमध्ये 36 महिन्यांपर्यंत कोणंतही ट्रान्झॅक्शन झालं नाही किंवा त्यात पैसे भरले गेले नाहीत तर तुमचं पीएफ अकाउंट बंद होतं. त्यामुळे ईपीएफओ (EPFO) तुमचं अकाउंट इनऑपरेटिव्ह (Inoperative) अर्थात निष्क्रिय श्रेणीत ठेवतं.

नव्या नियमांनुसार, जर संबंधित कर्मचाऱ्याने ईपीएफमधील शिल्लक रक्कम काढून घेण्यासाठी अर्ज केला नाही तर त्याचं पीएफ अकाउंट निष्क्रिय असं गृहीत धरलं जातं. तसंच सदस्य कायमस्वरुपी परदेशात वास्तव्यास गेला, सदस्याचा मृत्यू झाला, जर सदस्यानं सर्व निवृत्ती निधी काढून घेतला किंवा जर सात वर्षांपर्यंत कोणीही पीएफ अकाउंटवर दावा केला नाही, तर हा निधी सीनिअर सिटीझन्स वेल्फेअर फंडात जमा केला जातो.

निष्क्रिय अर्थात बंद पीएफ अकाउंटशी संबंधित दावे (Claims) निकाली काढण्यासाठी पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळे फसवणुकीशी संबंधित जोखीम कमी होते आणि योग्य दावेदारांना हक्काची रक्कम मिळू शकते, असं `ईपीएफओ`नं आपल्या एका परिपत्रकात म्हटलं आहे. निष्क्रिय पीएफ अकाउंटशी संबंधित दावे निकाली काढण्यासाठी कर्मचाऱ्याच्या संबंधित कंपनीनं तो दावा प्रमाणित करणं आवश्यक आहे. तथापि, ज्या कर्मचाऱ्यांची कंपनी बंद झाली आहे आणि दावा प्रमाणित करण्यासाठी कोणीही नसेल, तर बॅंक केवायसी (KYC) कागदपत्रांच्या आधारे असा दावा प्रमाणित करू शकते.

जर पीएफची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या मान्यतेनंतर पैसे काढले किंवा हस्तांतरित केले जातात. तसंच जर ही रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 50 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर अकाउंट ऑफिसर निधी हस्तांतरण किंवा काढण्यास मान्यता देऊ शकतील. जर रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर डिलिंग असिस्टंटला (Dealing Assistant) ती मंजूर करता येईल.

पीएफच्या रकमेसाठी आवश्यक केवायसी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, ईएसआय ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा समावेश असतो. याशिवाय आधार कार्डासारखं सरकारकडून जारी केलेलं अन्य कोणतेही ओळखपत्र यासाठी वापरलं जाऊ शकतं. यानंतर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर अधिकारी रकमेनुसार खात्यातून पैसे काढणं किंवा खातं हस्तांतरणास मान्य देऊ शकतात.

याशिवाय, पीएफ अकाउंट निष्क्रिय झालं तर तुम्हाला ट्रॅन्झॅक्शन करता येत नाही. त्यामुळे असं अकाउंट तुम्हाला अ‍ॅक्टिव्ह (Active) करावं लागतं. यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यानुसार, अकाउंट अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला ईपीएफओमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. पीएफ अकाउंट निष्क्रिय किंवा बंद झालं तर तरी त्यातील रकमेवर व्याज (Interest) मिळत राहतं. हे पैसे बुडत नाहीत तर तुम्हाला परत मिळतात. या पूर्वी अशा अकाउंटसवर व्याज मिळत नव्हतं. परंतु, 2016 मध्ये नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आणि व्याज देण्यास सुरुवात झाली. जो पर्यंत तुम्ही 58 वर्षांचे होत नाहीत, तोपर्यंत पीएफ अकाउंटमधल्या रकमेवर व्याज मिळत राहतं.

First published:

Tags: Epfo news