आता 10 हजार रुपयांमध्ये सुरू करा नफा मिळवून देणारा व्यवसाय

आता 10 हजार रुपयांमध्ये सुरू करा नफा मिळवून देणारा व्यवसाय

आता व्यवसाय करण्यासाठी मोठ्या भांडवलाची नाही तर नव्या आयडियांची गरज आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की आधी जादा भांडवल उभं करावं लागतं. मात्र कमी भांडवलात अधिक नफा तुम्ही कमवू शकणार आहात. कारण आता फक्त 10 हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय करून अधिक नफा कमवू शकता. दिवाळी, क्रिसमस आणि न्यू ईयर या सणांसाठी खास मेणबत्तीची विशेष मागणी असते. नुसत्या मेणबत्यांसोबतच विविध आकारांच्या, फ्रेग्रन्स असणाऱ्या मेणबत्त्यांनाही खास सणांच्या निमित्तानं महत्त्व आलं आहे. तुम्ही कमी पैशात व्यवसाय करण्याचा विचार करत असला तर हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या कमी पैशांमध्येही करू शकता. त्यातून मिळणारा नफाही चांगला असेल शिवाय घरच्या घरी व्यवसाय सुरू केल्यामुळे पैशांची अधिक बचतही होईल.

डिझायनर मेणबत्त्यांची वाढती क्रेझ

सणांसाठी सध्या साध्या मेणबत्त्यांऐवजी बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या मेणबत्त्या उपलब्ध असतात. आता मेणाचे छोटे दिवेही बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात. नियमित वापरली जाणारी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती, दिवाळीसाठी दिव्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मेणाच्या पणत्या, वाढदिवसासाठी वापरल्या जाणाऱ्या मेणबत्त्या, याशिवाय तुम्ही फेग्रन्स असणाऱ्या मेणबत्त्या बाजारात उपलब्ध असतात. दरवर्षी वेगवेगळे ट्रेण्ड येतात त्यानुसार त्यांचे आकार बदलतात मात्र बदलत्या ट्रेण्ड आणि लाइफस्टाईलनुसार मेणबत्त्या वापरण्याचं प्रमाणंही वाढत असल्यानं हा व्यावसाय करण्याची एक संधी आहे.

मेणबत्तीचा व्यावसाय करण्यासाठी कच्चा माल आणि त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. बाजारात काय ट्रेण्ड आहे? काय चांगलं चालेल आणि प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून मगच व्यावसायाचा कच्चा आराखडा तयार करा. साधारण हा व्यवसाय करण्यासाठी 10 हजारांचा खर्च येतो. तुम्ही मुद्रा योजना, बँक लोन अशा अनेक सुविधांचा लाभ घेऊनही इन्वेस्टमेंट स्वत:च्या रिस्कवर करू शकता. याशिवाय लोन किंवा व्यवसाय करण्यासाठी सरकारी सुविधा उपलब्ध आहेत त्यांचाही लाभ तुम्ही घेऊ शकता.

व्यवसाय कुठे करायचा आहे ते निश्चित करा.

मेणबत्ती तयार करणं, पॅकिंग त्यासाठी आवश्यक असणारं सामान आणि तयार झालेल्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला जागा आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी कुठे ठेवणार आहात याचा विचार आधी करा. त्यानुसार जागा निश्चित करा. त्यासाठी वेगळी जागा घेणं किंवा घरात करणार असाल तर एक वेगळी खोली असणं आवश्यक आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखादी खोली भाड्यानेही घेऊ शकता.

आकर्षक ब्रॅण्डिंग

तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं नाव आकर्षक आणि सोप ठेवलं तर ते ग्राहकांच्या लक्षात राहिल. त्यामुळे नाव वेगळं आणि हटके असेल यासाठी प्रयत्न करावा. यासोबतच शक्य असेल तेवढं वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रॅण्डिंगही करावं. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा आधारही घेऊ शकता. तुम्ही तुमचं नाव ठरवलं की ते रजिस्टर करा आणि त्याबाबतच लायसन घ्या. रजिस्ट्रेशन आणि लायसन घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.

पॅकिंगकडे विशेष लक्ष द्या.

तुमची वस्तू तयार झाल्यानंतर बाजारात येण्याआधी त्याचं पॅकिंग चांगलं असणं आवश्यक आहे. प्रतिस्पर्ध्यांनी काय केलं आहे आणि आपण काय करणं आवश्यक आहे. याबाबत थोडा अभ्यास करा. याशिवाय तुम्ही वासाच्या मेणबत्त्या तयार केल्या असतील तर त्याचं पॅकिंग जास्त जाड आणि चांगलं असेल ज्यामुळे त्याचा सुगंध उडून जाणार नाही याची काळजी घ्या. आकर्षक पॅकिंग असेल तर तुमच्या मेणबत्त्यांचा जास्त खप वाढेल. पॅकिंग ग्राहकांना आसर्षित करतं त्यामुळे तुमचं पॅकिंग वेगळं आणि हटके असेल यावर भर द्या. यासोबत काही नवीन संकल्पना तयार केल्या असतील तर त्याही तुम्ही ग्राहकांना दाखवा. त्याचं पैकिंग आणि डिस्प्ले दोन्ही आकर्षक केल्यास त्याचा फायदा होईल आणि अर्थातच नफा होण्यास मदत होईल.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 28, 2019, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading