Home /News /money /

हा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत

हा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत

केंद्र सरकार तुम्हाला आर्थिक मदत करायला तयारच आहे. चला तर जाणून घेऊया या नव्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती.

    मुंबई 17 जून: केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आलं आणि त्यांनी नोकरी हा शब्द रोजगाराने बदलून टाकला. आम्ही नोकऱ्या देऊ असं म्हणण्याऐवजी त्यांनी रोजगार निर्माण करू असं जाहीर केलं. कोरोनाच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर अनेकांना स्वत:चा व्यवसाय करण्याचं महत्त्व लक्षात आलं आहे. त्यामुळे अनेक जण व्यवसाय करायचा (How To Start Low Cast Business) विचार करत आहेत. तुम्ही जर असंच कमी भांडवलात चांगली कमाई करून देणारा व्यवसाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हा व्यवसाय सुरू करायला तुम्हाच्याकडे 2.14 लाख रुपयांचं भांडवल हवंय. आणि विशेष म्हणजे केंद्र सरकार तुम्हाला आर्थिक मदत करायला तयारच आहे. चला तर जाणून घेऊया या नव्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती. हा व्यवसाय कुठला आहे? सध्या घरात कटलरीची गरज वाढते आहे त्यामुळे तुम्ही कटलरीचा व्यवसाय (Cutlery Business) केलात तर तो तुम्हाला बंपर कमाई करून देईल. या व्यवसायात तुम्ही कटलरीच्या माध्यमातून हँड टूल (Hand Tools) आणि शेतीसाठी वापरली जाणारी काही टूलही तयार करू शकता. त्यातच तुम्ही ही टूल्स मोठ्या प्रमाणात निर्यातही करू शकता. घरात लागणाऱ्या वस्तुंव्यतिरिक्त इतर अनेक वस्तु तुम्ही तयार करू शकता. SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! चुकूनही करू नका ही 3 कामं, वाचा बँकेने काय म्हटलं? कुठल्या वस्तूंचं करू शकता उत्पादन? या व्यवसायात तुम्ही कटलरीच्या माध्यमातून हँड टूल आणि शेतीसाठी वापरली जाणारी काही टूलही तयार करू शकता. कटलरीमध्ये प्रामुख्याने तुमच्या डायनिंग टेबलवर असलेले स्टेनलेस स्टीलचे चमचे (Spoon), फोर्क (Fork), सुरी (Knife) या सगळ्याचा सामावेश होतो. या वस्तू तुम्हाला घरोघरी वापरात असलेल्या दिसतात. तुम्ही त्यांच उत्पादन करू शकता. घरांबरोबरच हॉटेल्समध्येही ही कटलरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते त्यामुळे याला मोठी मागणी आहे. त्यामुळे या स्टेनलेस स्टीलच्या वस्तू तुम्ही तयार केल्यात तर बंपर कमाई होऊ शकते. Post Office मध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे दरमहा किती कमाई होईल? या व्यवसायाचा सेटअप तयार करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 1.8 लाख रुपये खर्च करायला लागतील. त्यासाठी तुम्हाला वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्राइंडर, हँड ड्रिलिंग, हँड ग्राइंडर, बेंच, पॅनल बोर्ड व अन्य टूल्स खरेदी करावी लागतील. या स्टेनलेस स्टीलच्या (Stainless Steel) वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी तुम्हाला 1.2 लाख रुपयांचा खर्च करावा लागेल. तुमच्याकडच्या कामगारांच्या पगारासाठी तुम्हाला दरमहा 30 हजार रुपयांचा खर्च करावा लागेल. एकूणात 2.14 लाख रुपयांचा खर्च करावा लागेल. या व्यतिरिक्त जे खर्च असतील त्यासाठी तुम्ही सरकारी योजनेची मदत घेऊ शकता. केंद्र सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत (PM Mudra Shme) तुम्ही व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळावं म्हणून बँकेत अर्ज करू शकता. बँकेत करा कर्जासाठी अर्ज केंद्र सरकार तरुणांना नवे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज (Bank loan for Business) मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला एका अर्जात तुमचं नाव, पत्ता, व्यवसायाच्या ठिकाणाचा पत्ता, शिक्षण, सध्याची कमाई आणि किती कर्ज हवं आहे हे लिहून द्यावं लागेल. त्यानंतर बँक तुमच्या अर्जावर विचार करून तुम्हाला कर्ज देईल.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Business, Business News, Investment, Money

    पुढील बातम्या