कोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे, वापरा ही पद्धत

कोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे, वापरा ही पद्धत

Google ने शुक्रवारी गुगल प्ले स्टोअरवरून पेटीएम (Paytm) अ‍ॅप हटवले होते. पेटीएमने त्यांच्या ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची हमी जरी दिली असली तरी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेच.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : Google ने शुक्रवारी गुगल प्ले स्टोअरवरून पेटीएम (Paytm) अ‍ॅप हटवले होते. अशावेळी ग्राहकांना त्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये असणाऱ्या पैशांबाबत चिंता निर्माण झाली आहे. पेटीएमने त्यांच्या ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची हमी जरी दिली असली तरी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेच.

दरम्यान ग्राहकांकडे पेटीएम वॉलेटमधील पैसे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे. याकरता काही ठराविक शुल्क द्यावे लागते. ही सेवा फ्री नसल्यामुळे पेटीएमकडून पैसे बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी काही शूल्क आकारले जाते.

Paytm, PhonePAY, Payzapp यांसारख्या अनेक पेमेंट अ‍ॅपमध्ये पैसे भरणे विनाशुल्क असले तरी त्यातून पैसे बँक खात्यामध्ये भरण्यासाठी ठराविक चार्ज द्यावा लागतो. 2 ते 5 टक्क्यांदरम्यान हे शुल्क असते.

पेटीएममधून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावा लागतो 3 टक्के चार्ज

Paytm वॉलेटमधून बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 3 टक्के चार्ज वसुल करते. जेवढी रक्कम तुम्ही ट्रान्सफर करणार आहात त्याच्या 3 टक्के चार्ज द्यावा लागतो. सुरुवातीला हे शुल्क 5 टक्के होते, त्यानंतर हा दर कमी करत 3 टक्के करण्यात आला आहे. ही संधी केवळ 30 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानंतर शुल्क पुन्हा एकदा वाढवले जाऊ शकते.

(हे वाचा-या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख)

ही पद्धत वापरल्यास नाही द्यावे लागणार शुल्क

कोणत्याही शुल्काशिवाय तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. युजर पेटीएम अ‍ॅपमधून तुमच्या बँक खाताच्या माध्यमातून UPI ने कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. UPI च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएम कोणतीही फी घेत नाही. सर्व ई-वॉलेट कंपन्या UPI शी जोडलेल्या आहेत. फ्रीमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएममध्ये पूर्ण केवायसी होणे आवश्यक आहे. केवायसी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कोणताही अतिरिक्त चार्ज दिल्याशिवाय तुम्ही बँक खात्यामध्ये पैसे पाठवू शकता.

का आकारले जाते शुल्क?

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा बंक खात्यातून मोबाइल वॉलेटमध्ये पैसे पाठवता तेव्हा मोबाइल वॉलेट कंपनीला काही पैसे ट्रान्झॅक्शन चार्ज स्वरूपात द्यावे लागतात.

(हे वाचा-शाळा विकणे आहे! कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला)

याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पेटीएम वॉलेटमध्ये पैसे अ‍ॅड करता त्यावेळी पेटीएमला संबंधित बँकेला चार्ज द्यावा लागतो. ग्राहकांकडून याबाबत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र पण जेव्हा ग्राहक मोबाइल वॉलेटमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करतात तेव्हा खर्च वसूल करण्यासाठी ग्राहकांना शुल्क आकारले जाते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 19, 2020, 12:57 PM IST

ताज्या बातम्या