चांगल्या अप्रायझलसाठी 'अशी' करा तयारी

चांगल्या अप्रायझलसाठी 'अशी' करा तयारी

तुमच्या वर्षभरातल्या कामाचा आढावा तुमचा बाॅस घेतो आणि त्याप्रमाणे पगारवाढ ठरते. अप्रायझलसाठी तुमचा आणि तुमच्या मॅनेजरचा संवाद घडतो. अशा वेळी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : एप्रिल महिना उजडला की अनेक कंपन्यांमध्ये अप्रायझलसाठीची प्रोसेस सुरू होते. तुमच्या वर्षभरातल्या कामाचा आढावा तुमचा बाॅस घेतो आणि त्याप्रमाणे पगारवाढ ठरते. अप्रायझलसाठी तुमचा आणि तुमच्या मॅनेजरचा संवाद घडतो. अशा वेळी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

1. सिस्टिम समजून घ्या

तुमचं अप्रायझल नक्की कशावर अवलंबून आहे, हे पाहा. म्हणजे फक्त दिलेलं लक्ष्य (टारगेट) आणि काम ( अचिव्हमेंट ) हेच पाहणार आहेत की तुमची काम करण्याची पद्धत, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण, टीमवर्क, कामात जलदपणा, प्रामाणिकपणा हाही मोजला जाणार का?

2. वर्षभराच्या कामाचे पुरावे गोळा करा

तुमच्या कामाची यादी तुमच्या मॅनेजरकडे असतेच. पण तुम्ही वर्षभरात तुमच्यामुळे कामाला झालेली मदत, बाॅसनं दिलेलं अवाॅर्ड, केलेलं कौतुक, अनेकदा जास्त वेळ थांबून केलेलं काम या गोष्टींची यादी करा. अप्रायझल मुलाखतीच्या वेळी ते उपयोगी पडेल.

3. सेल्फ अप्रायझल

अनेक कंपन्यांमध्ये अप्रायझलचा फाॅर्म स्वत:च भरायचा असतो. तो भरायला भले वेळ घ्या, पण एकही मुद्दा विसरू नका. वर्षभरात केलेलं काम फाॅर्ममध्ये भरायला अजिबातच लाजू नका. डिटेल्स भरणं खूप महत्त्वाचं आहे.

  4. मॅनेजरशी संवाद ठेवा

अप्रायझल इंटरव्ह्यूमध्ये बाॅसशी संवाद असू द्या. वर्षभरात काय चुका झाल्या, त्यात काय बदल करता येईल. कामात कशी सुधारणा करता येईल याचीही चर्चा करा.

5. मॅनेजरच्या जागी स्वत:ला ठेवा

अप्रायझलच्या आधी तुम्ही मॅनेजर काय विचार करतोय, याचाही विचार करा. त्याच्या जागी स्वत:ला उभं करून अप्रायझलबद्दल विचार करा.

 6. काही आश्चर्यांच्या धक्क्यांची तयारी ठेवा

मुलाखती दरम्यान तुम्ही अपेक्षा न केलेल्या गोष्टी बोलल्या जातील याची तयारी करा. स्वत:ला मोकळं ठेवा. खुल्या विचारांनी स्वीकार करा.

7. उपाय ठरवा

मुलाखतीत तुमच्या कामातले दोष सांगितले गेले तर तुम्ही त्यात कशी सुधारणा करणार ते सांगा.

8. पुढच्या वर्षाची ध्येय ठरवा

मागील वर्षाचा आढावा घेतला की पुढच्या वर्षातली तुमची ध्येय ठरवा. त्याबद्दल मॅनेजरला सांगा. ते ठरवताना वेळ, उपलब्धता याचा विचार करा.

9. इमोशनला शब्द नकोत

अप्रायझलच्या वेळी प्रोफेशनल राहा. मॅनेजरसोबत उगाच फेअर, अनफेअर असे भावनिक शब्द वापरू नका.

10. अप्रायझल पूर्ण करा

तुम्ही साईन आॅफ केल्याशिवाय हे पूर्ण होणार नाही. तेव्हा बाॅसबरोबरही पुढच्या वर्षाचं ध्येय ठरवूनच हे पूर्ण करा.

VIDEO: आपल्या वाढदिवसानिमित्त आठवेलेंनी मोदींवर केली 'ही' कविता

First published: April 1, 2019, 3:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading