Home /News /money /

LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन कसा भराल?

LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन कसा भराल?

भारतातील सर्वात मोठ्या आणि जुन्या विमा कंपन्यांपैकी एक, LIC कडे सर्वाधिक पॉलिसीधारक आहेत. अशा परिस्थितीत, येथे प्रीमियम ऑनलाइन जमा करणे हा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे.

    मुंबई, 30 जून: तुमची LIC पॉलिसी असेल तर तुम्ही विम्याचा हप्ता घरी बसूनही भरू शकता, त्यासाठी एलआयसी शाखेत जाण्याची गरज नाही. LIC च्या वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून देखील पेमेंट सहज करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. LIC प्रीमियमचे पेमेंट ऑनलाइन सबमिट केल्यानंतर, पेमेंट पावती काळजीपूर्वक डाउनलोड करा. एलआयसीच्या शाखेत जाऊन प्रीमियम जमा केल्याने तुमचा वेळ वाया जातो. भारतातील सर्वात मोठ्या आणि जुन्या विमा कंपन्यांपैकी एक, LIC कडे सर्वाधिक पॉलिसीधारक आहेत. अशा परिस्थितीत, येथे प्रीमियम ऑनलाइन जमा करणे हा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे. GST Council Meeting: दही-पनीरसह अनेक पॅकबंद खाद्यपदार्थांच्या महाग, हॉटेलमध्ये राहण्यासाठीही जास्त पैसे द्यावे लागणार अशा प्रकारे घरबसल्या प्रीमियम जमा करा पॉलिसीधारक त्यांच्या मोबाइलवरून एलआयसी पे डायरेक्ट अॅप डाउनलोड करून त्यांच्या पॉलिसीचा प्रीमियम जमा करू शकतात. याशिवाय कंपनीच्या वेबसाइटवरूनही प्रीमियम जमा करता येईल. यासाठी तुम्हाला प्रथम www.licindia.in वर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला येथे ' Pay Direct' लिहिलेले दिसेल जेथे तुम्ही लॉग इन न करताही प्रीमियम भरू शकता. येथे दुसरे पेज उघडेल जिथे 'Please Select', 'Premium Payment' असे लिहिलेले असेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल आणि Proceed बटण दाबावे लागेल. Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून नवी नियम लागू; काय होईल फायदा? प्रीमियम पेमेंट कसे तपासणार? >> एलआयसी वेबसाइट https://www.licindia.in/ वर जा. >> तुमचे नाव, पॉलिसी क्रमांक इत्यादी टाकून येथे नोंदणी करा. >> एकदा नोंदणी केल्यानंतर, तुम्ही कधीही पॉलिसीची स्थिती ऑनलाइन तपासू शकता. >> 022-68276827 या क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकता. >> LICHELP <policy number> लिहून 9222492224 या क्रमांकावर संदेश पाठवा, हा संदेश पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. UPI पेमेंट अॅप्स अनेक UPI पेमेंट अॅप्स आहेत जिथे LIC प्रीमियम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. येथून ग्राहक सहजपणे प्रीमियम भरू शकतात. PhonePe, Paytm, Google Pay इत्यादी पेमेंट अॅप्सला भेट देऊन LIC प्रीमियम भरला जाऊ शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, LIC, Money

    पुढील बातम्या