मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरी बदलल्यानंतर पूर्ण करा Provident Fund संबंधीचं हे महत्त्वाचं काम, अन्यथा अडकू शकतात पैसे

नोकरी बदलल्यानंतर पूर्ण करा Provident Fund संबंधीचं हे महत्त्वाचं काम, अन्यथा अडकू शकतात पैसे

कर्मचाऱ्यांनी आपला प्रॉव्हिडंट फंड अकाउंटचे वेगवेगळे UAN मर्ज (Merge) करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ईपीएफ खात्यांना (EPF Account) एकत्र जोडण्यासाठी यूएएनची संकल्पना लागू करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी आपला प्रॉव्हिडंट फंड अकाउंटचे वेगवेगळे UAN मर्ज (Merge) करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ईपीएफ खात्यांना (EPF Account) एकत्र जोडण्यासाठी यूएएनची संकल्पना लागू करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी आपला प्रॉव्हिडंट फंड अकाउंटचे वेगवेगळे UAN मर्ज (Merge) करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ईपीएफ खात्यांना (EPF Account) एकत्र जोडण्यासाठी यूएएनची संकल्पना लागू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 1 जुलै : नोकरदार वर्गासाठी प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) हा अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त आर्थिक घटक आहे. या फंडावर नोकरदारांचं निवृत्तीनंतरच्या जीवनाचं नियोजन अवलंबून असतं. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक टंचाई उदभवल्यास हा फंड महत्वाचा आधार ठरतो. सध्याच्या कोरोनाकाळात या फंडाचं आर्थिकदृष्ट्या महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे.

खासगी क्षेत्रात (Private Sector) कार्यरत असणाऱ्या व्यक्ती सातत्याने नोकरी बदलत असतात. ते ज्या कंपनीत काम सुरू करतात त्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड अकाउंटसाठी नवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी केला जातो. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आपला प्रॉव्हिडंट फंड अकाउंटचे वेगवेगळे UAN मर्ज (Merge) करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ईपीएफ खात्यांना (EPF Account) एकत्र जोडण्यासाठी यूएएनची संकल्पना लागू करण्यात आली आहे.

यूएएन मर्ज करण्याची अशी आहे प्रक्रिया -

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, वेगवेगळे यूएएन मर्ज करण्याच्या दोन पध्दती आहेत. यातील पहिल्या पध्दतीनुसार, ईपीएफओचे सदस्य युनिफाईड पोर्टलवर (Unified Portal) लॉगिन करुन यूएएनच्या माध्यमातून लिंक असलेल्या ईपीएफ अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची रिक्वेस्ट टाकू शकतात. त्यानंतर आधीच्या सर्व खात्यांमधून नवीन खात्यावर पैसे वर्ग केले जातात आणि जुने यूएएन बंद होते. जुना यूएएन बंद झाल्यानंतर त्याची माहिती ईपीएफओ मेसेज करुन देते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नवा यूएएन एक्टिव्हेट होत नसेल तर तुम्हाला जुने ईपीएफ अकाउंट नव्या युएएनमध्ये ट्रान्सफर करावे लागेल. अनेकदा जुनी कंपनी किंवा जुना मालक पीएफचे अॅरियर डिपॉझिट करत नाहीत. जर जुने ईपीएफ अकाउंट्स नव्या यूएएनला लिंक केले तर हे अॅरियर नव्या यूएएनमध्ये डिपॉझिट होतील.

(वाचा - कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये मिळणार वाढलेला पगार)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दुसऱ्या पध्दतीत थोडा अधिक वेळ लागू शकतो. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे दोनपेक्षा अधिक यूएएन असतील तर तो कर्मचारी सध्या कार्यरत असलेली कंपनी किंवा ईपीएफओला याबाबत मेल करुन माहिती देऊ शकतील. ईपीएफओच्या या uanepf@epfindia.gov.in या अधिकृत मेलवर याबाबत मेल केल्यास ईपीएफओ याचे व्हेरिफिकेशन (Verification) करते आणि त्यानंतर जुना यूएएन ब्लॉक केला जातो. जर कर्मचाऱ्याने ईपीएफ अकाउंट नव्या यूएएनमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी क्लेम केल्यास ट्रान्सफरची प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी तुम्ही केवायसी पुर्ण करणे गरजेचे आहे.

एकापेक्षा अधिक यूएएन असण्याची ही असू शकतात कारणे -

कोणत्याही कर्मचाऱ्याकडे एका पेक्षा अधिक युनिवर्सल अकाउंट क्रमांक असण्याची दोन कारणे असू शकतात. त्यात पहिले कारण म्हणजे, जेव्हा कर्मचारी आपल्या नव्या कंपनी किंवा मालक सदयःस्थितीतील यूएएनची माहिती देत नाहीत तेव्हा कंपनी दुसरा यूएएन क्रमांक जारी करते. दुसरे कारण म्हणजे जेव्हा जुनी कंपनी किंवा मालक वेळेवर याचे अनुपालन करत नाही. तेव्हा कर्मचाऱ्याकडे एकापेक्षा अधिक यूएएन असू शकतात. जेव्हा कोणताही कर्मचारी नोकरी सोडेल, तेव्हा कंपनीला कर्मचाऱ्याच्या नोकरी सोडण्याच्या तारखेची माहिती दिली जाते. मात्र कंपन्यांना ही माहिती भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे दरमहा दाखल केलेल्या इलेक्ट्रॉनिक चालान व रिटर्नमध्ये (ECR) द्यावी लागते. ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली नाही तर नवी कंपनी कर्मचाऱ्यासाठी नवा यूएएन जारी करते.

First published:

Tags: Epfo news, Investment, Money, PF Amount, PF Withdrawal, Tech news