डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card; ही आहे सोपी प्रक्रिया

आपण हे ऑनलाईन पॅनकार्ड कोणत्याही शुल्काशिवाय बनवू शकता किंवा त्यासाठी कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

आपण हे ऑनलाईन पॅनकार्ड कोणत्याही शुल्काशिवाय बनवू शकता किंवा त्यासाठी कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 जून : पॅनकार्ड हे बँकांसह इतर आर्थिक व्यवहारांमध्ये लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्वांकडे आता पॅनकार्ड (Pan Card) असणं बंधनकारक झालं आहे. अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये आपल्याला पॅन कार्ड मागितलं जातं. आपल्याकडं पॅन कार्ड नसल्यास आणि आपल्याला पॅन कार्ड बनवायचे असेल तर आपण हे काम 10 मिनिटांत पूर्ण करू शकतो. तुम्हाला ऑनलाईन इन्स्टंट पॅन कार्ड (Instant Pan Card ) बनवायचे असेल तर तुम्ही हे कार्ड अधिकृत संकेतस्थळावरून मिळवू शकता. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटमध्ये बदल झाल्यामुळं प्रक्रिया थोडी बदलली आहे. आपण हे ऑनलाईन पॅनकार्ड कोणत्याही शुल्काशिवाय बनवू शकता किंवा त्यासाठी कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. आपण काही मिनिटांत पॅन कार्ड सहजपणे बनवू शकतो आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ शकतो. हे एक इन्स्टंट पॅन कार्ड आहे, ज्यासाठी आपल्याला पॅन कार्ड हातात येण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. हे त्वरित डिजिटलरित्या तयार केलं जाऊ शकतं आणि आपला पॅन क्रमांक जनरेट केला जातो आणि तो आपल्या सामान्य पॅन कार्डप्रमाणे आर्थिक व्यवहारांमध्ये वैध मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला या पॅनकार्डसाठी कोणतेही डॉक्युमेंट अपडेट करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे पॅन कार्ड नसल्यास आणि आपल्याला त्वरित पॅन कार्डची आवश्यकता असल्यास आपण ते 10 मिनिटांत तयार करू शकता आणि ऑर्डर दिल्यानंतर काही दिवसात छापील पॅनकार्ड  घरी देखील येईल. असं मिळवा ऑनलाइन पॅन कार्ड -
  सर्वात अगोदर Incometax.gov.in साईटवर जा.
  होम पेजवरील Our Services ऑप्शनवर जाऊन तेथे See More वर क्लिक करा.
  त्यानंतर आपल्याला Instant E-Pan हा ऑप्शन दिसेल, येथून आपण Instant Pan Card साठी अर्ज करू शकतो.
  नवीन पॅनकार्ड मिळवण्यासाठी Get New-ePIN वर क्लिक करा.
  त्यानंतर तुम्हाला आधार नंबर मागितला जाईल, आधार नंबर एंटर करून Continue च्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  यानंतर वेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला आधार कार्डाशी जोडलेल्या फोन नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.
  मिळालेला ओटीपी नंबर फिल करून त्याला कन्फर्म करावं लागेल.
  ओटीपी कन्फर्म केल्यानंतर वेबसाइटवर आधार कार्डाशी संबंधित माहिती दिसू लागेल.
  त्यानंतर आपल्याला आईडी वगैर वेरिफाय करून ओकेवर क्लिक करायचे आहे.
  पॅन कार्ड डाऊनलोड करण्याची प्रोसेस - त्यानंतर पुन्हा आपल्याला होम पेजवर जायचे आहे. तिथे पुन्हा Our Services च्या ऑप्शनवर जायचे असून See More वर क्लिक करायचे आहे. पुन्हा Instant E-Pan वर क्लिक करायचे आणि चेक स्टेट्स असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करायचे. यानंतर पुन्हा आधार नंबर मागितला जाईल, तो नंबर आपल्याला फिल करावा लागेल. त्यानंतर पुन्हा आपल्याला ओटीपी मिळेल, तो फिल करा. त्यानंतर आपल्याला ऑनलाइन पॅन कार्ड दिसू लागेल, ते आपण डाउनलोड करू शकतो आणि सर्व ठिकाणी ते वैध आहे.
  Published by:News18 Desk
  First published: