मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, Aadhaar Link बाबत मोठी घोषणा

Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, Aadhaar Link बाबत मोठी घोषणा

रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holder) महत्त्वाची बातमी आहे. सरकारकडून रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Ration Card Link to Aadhaar Card) करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 मार्च : रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holder) महत्त्वाची बातमी आहे. सरकारकडून रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Ration Card Link to Aadhaar Card) करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. रेशन कार्ड होल्डर आपलं रेशन कार्ड 30 जून 2022 पर्यंत लिंक करू शकतात. जर तुम्ही अद्यापही रेशन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल, तर लवकर लिंक करा. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (Food and Public Distribution Department) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती ती आता 31 जून 2022 करण्यात आली आहे.

Ration Card अतिशय महत्त्वाचं सरकारी डॉक्युमेंट आहे. रेशन कार्डवर कमी दरात स्वस्तात धान्य मिळतं. त्याशिवाय इतरही अनेक फायदे आहे. केंद्र सरकारने 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजना (One Nation One Ration Card) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशात लाखो लोकांना फायदा मिळतो. आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केल्यानंतर 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेचा लाभ घेता येतो. यामुळे देशातील कोणत्याही राज्यात रेशन स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेता येतं. एका राज्यातील रेशन कार्ड यामुळे दुसऱ्या राज्यातही वापरता येतं.

हे वाचा - Ration Card Update! तुम्हीही अशी चूक केली का? रद्द होईल रेशन कार्ड, पाहा नवा नियम

ऑनलाइन कसं लिंक कराल आधार कार्ड -

- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.

- इथे Start Now वर क्लिक करा.

- त्यानंतर तुमचा पत्ता, जिल्हा, राज्य असे डिटेल्स भरावे लागतील.

- त्यानंतर 'Ration Card Benefits' वर क्लिक करा.

- इथे आधार नंबर, रेशन कार्ड नंबर, ईमेल, मोबाइल नंबर डिटेल्स भरा.

- त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल.

- OTP टाका. त्यानंतर स्क्रिनवर प्रोसेस पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.

- त्यानंतर आधार वेरिफाय होईल आणि तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक होईल.

हे वाचा - Ration Card Update: आता रेशन धान्य दुकानं होणार डिजीटल, ई-सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी

ऑफलाइन असं करा लिंक -

रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी काही डॉक्युमेंट आधार कार्ड कॉपी, रेशन कार्ड कॉपी आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट साइज फोटो रेशन कार्ड केंद्रात जमा करावा लागेल. त्याशिवाय रेशन कार्ड केंद्रात तुमचं आधार कार्ड बायोमेट्रिक डेटा वेरिफिकेशनही होऊ शकतं.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, Ration card, Tech news