मराठी बातम्या /बातम्या /मनी /

10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर 'हे' काम लगेच करा, ही आहे शेवटची तारीख

10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर 'हे' काम लगेच करा, ही आहे शेवटची तारीख

एखाद्या छोट्या कामासाठी तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील असे तुम्हाला वाटत नसेल, तर तुम्हाला 31 मार्च 2022 पूर्वी एक काम पूर्ण करावे लागेल.

एखाद्या छोट्या कामासाठी तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील असे तुम्हाला वाटत नसेल, तर तुम्हाला 31 मार्च 2022 पूर्वी एक काम पूर्ण करावे लागेल.

एखाद्या छोट्या कामासाठी तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील असे तुम्हाला वाटत नसेल, तर तुम्हाला 31 मार्च 2022 पूर्वी एक काम पूर्ण करावे लागेल.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 17 मार्च : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या अनेक आर्थिक कामं पूर्ण करण्याची तुमचीही गडबड सुरू असेल. या धावपळीत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला 10,000 रुपयांचे नुकसान होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला एक महत्वाचं काम 31 मार्च 2022 पूर्वी पूर्ण करावे लागणार आहे. होय, आम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याबद्दल बोलत आहोत (PAN Aadhaar Link).

दहा हजार रुपयांचा भुर्दंड

आयकर विभागाच्या (Income Tax Department) नियमांनुसार, पॅन क्रमांक आधारशी जोडण्याची अंतिम तारीख (PAN Aadhaar Link Last Date) 31 मार्च 2022 आहे. ही दोन कागदपत्रे लिंक करणे अनिवार्य आहे, जर तुम्ही 31 मार्चपर्यंत तसे केले नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड (Penalty for not linking PAN with Aadhaar) भरावा लागेल.

तुमचा पॅन-आधार कसं लिंक करायचं?

जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या पायऱ्या फॉलो करून ते लिंक करू शकता (How To Link Pan Aadhaar).

या आठवड्यात सर्व सरकारी-निमसरकारी बँका 4 दिवस बंद राहणार! काय आहे कारण?

Step-1: सर्वप्रथम तुम्ही आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal या साइटला भेट द्या

Step-2: यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला 'Link Aadhaar' टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा.

Step-3: यानंतर तुम्हाला पॅनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक, नाव आणि मोबाइल क्रमांकाचा तपशील विचारला जाईल.

Step-4: हे तपशील भरल्यानंतर, तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला OTP मिळेल. ओटीपी भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, तुमचे पॅन कार्ड आणि आधार लिंकिंगची पुष्टी होईल.

Step-5: तुमचे पॅन कार्ड आणि आधार आधीच लिंक केलेले असल्यास, तुम्हाला त्याचे पुष्टीकरण दाखवले जाईल.

10 मिनिटांत किराणा घरपोच देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीशी झोमॅटोने बांधलं संधान

तुम्ही तुमचा पॅन आणि आधार एसएमएसद्वारे देखील लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवायचा आहे. तुम्हाला या दोनपैकी कोणत्याही एका नंबरवर UIDPAN फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवावा लागेल. उदाहरणार्थ UIDPAN 098765432109 AJTAK2022M

First published:

Tags: Aadhar card link, Pan card