पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खास टिप्स, असे निवडा म्युच्युअल फंड

पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खास टिप्स, असे निवडा म्युच्युअल फंड

फंड मॅनेजर वेगवेगळ्या फंडात पैसे गुंतवतात. त्याचं रिटर्न गुंतवणूकदारांना मिळतं.

  • Share this:

मुंबई, 01 जून : नोकरी सुरू झाली की प्रत्येक जण भविष्यातल्या गुंतवणुकीचा विचार करतात. हल्ली सगळ्यांचं लक्ष म्युच्युअल फंडांकडे असतं. इथली गुंतवणूक कमी जोखमीची असते. शेअर बाजाराबद्दल तुम्हाला फारसं कळत नसेल तर म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. फंड मॅनेजर वेगवेगळ्या फंडात पैसे गुंतवतात. त्याचं रिटर्न गुंतवणूकदारांना मिळतं.

कमी काळासाठी कर्ज हवंय? 'हा' आहे उत्तम उपाय

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. एक SIP आणि दुसरा एक रकमी गुंतवणूक. शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं. पण हे फंड कसे निवडायचे? कुठले फंड चांगले असतात?

डेट फंड्स  - डेट फंडसारखे म्युच्युअल फंड आहेत, जे गुंतवणूकदारांचे पैसे डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये  लावतात. इंस्ट्रुमेंट्स म्हणजे काॅल मनी, बाॅण्ड, डिबेंचर्स, सरकारी सिक्युरिटीज, डिपाॅझिट सर्टिफिकेट आणि कमर्शियल पेपर. वेगवेगळ्या आर्थिक लक्ष्याप्रमाणे डेट फंड असतात.

तुमची बँक तुमच्याकडून 'असे' पैसे वसूल करून घेते

डेट फंड  - डेट फंड अनेक प्रकारचे असतात.लिक्विड फंड, अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंड, शाॅर्ट टर्म फंड, गिल्ट फंड, इन्कम फंड, क्रेडिट आॅप्युर्चनिटी फंड, मंथली इन्कम प्लॅन आणि फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन.

लिक्विड फंड्स - कमी काळासाठी गुंतवणूक करणारे फंड लिक्विड मानले जातात. लिक्विड फंडाला मनी मार्केट फंडही म्हटलं जातं. लिक्विड फंडात काही दिवसांपासून काही आठवडे गुंतवणूक करणं शक्य असतं. जास्त पैसे मिळाले तर या फंडात टाकले जातात. या फंडांना एक्झिट लोड लागत नाही.

लिक्विड फंडातून रक्कम त्वरित बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते. या फंडात तुम्ही थोड्या दिवसांकरता गुंतवणूक करू शकता. यातली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंड्स  - अल्ट्रा शाॅर्ट फंडात काही आठवड्यांपासून तीन महिन्यांपर्यंत गुंतवणूक शक्य असते. लिक्विड फंडाच्या तुलनेत अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंडात धोका जास्त असतो. पण दुसऱ्या लाँग टर्म फंडाच्या तुलनेत इथे धोका कमी असतो आणि एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळतात.

खिसा होणार रिकामा! गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत मुंबईतले दर

ज्यांना आपले पैसे थोड्या काळाकरता गुंतवायचे असतील, तर हा फंड चांगला आहे. हे फंड आपला पोर्टफोलिओ काही काळाकरता डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवतात. हे फंड सरकारी सिक्युरिटीज, डिपाॅझिट सर्टिफिकेट्स, कंपनीज आणि दुसऱ्या आर्थिक संस्था इथे डिपाॅझिट करतात.

शाॅर्ट टर्म फंड - शाॅर्ट टर्म फंड थोडे जास्त काळाच्या गुंतवणुकीसाठी असतो. शाॅर्ट टर्म फंडात 3 महिने ते 1 वर्षापर्यंत गुंतवणूक होते.

आपल्या गरजेप्रमाणे हे फंड्स निवडून आयुष्यभराची गुंतवणूक करता येते.

SPECIAL REPORT : तळीराम होणार आणखी 'झिंगाट', सरकारचा लवकरच नवा 'प्लॅन'!

First published: June 1, 2019, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading