Home /News /money /

Tax Saving : कर बचतीसाठी गुंतवणूक कशी कराल? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?

Tax Saving : कर बचतीसाठी गुंतवणूक कशी कराल? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?

पगारदार आणि पगार नसलेल्या दोन्ही करदात्यांच्या कर बचतीचा सीजन 1 एप्रिलपासून सुरू होतो. जाणकार गुंतवणूकदार या नात्याने तुम्ही अशा गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करावी (How to Invest?) ज्यामुळे तुम्हाला करमुक्त उत्पन्न मिळू शकेल.

    मुंबई, 5 डिसेंबर : कर बचत गुंतवणुकीबाबत (Tax Saving Investment) लोकांमध्ये अनेकदा संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. काही लोक चांगल्या भविष्यासाठी हा एक चांगला पर्याय मानतात, तर काही लोक कमी परताव्यामुळे किंवा गुंतवणुकीशी संबंधित इतर समस्यांमुळे त्यात गुंतवणूक (Investment Issues) करत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला कर बचतीशी संबंधित काही सामान्य गोष्टी माहित असणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी चांगली योजना निवडू शकता. पगारदार आणि पगार नसलेल्या दोन्ही करदात्यांच्या कर बचतीचा सीजन 1 एप्रिलपासून सुरू होतो. जाणकार गुंतवणूकदार या नात्याने तुम्ही अशा गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करावी (How to Invest?) ज्यामुळे तुम्हाला करमुक्त उत्पन्न मिळू शकेल. Investment Tips : Fixed Deposit करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या, आर्थिक नुकसान होणार नाही कर बचत योजना कशी प्लान कराल लोक अनेकदा गुंतवणूक पुढे ढकलतात, मात्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांतच गुंतवणूकीचे नियोजन सुरू करणे शहाणपणाचे असते. याचा फायदा असा होईल की तुम्हाला चांगल्या रिटर्नसह योजना समजून घेण्याची आणि गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. >> आधी जुन्या गुंतवणक, जसं की इंश्यूरन्स प्रीमियम, EPF खात्यात तुमचे योगदान, मुलांचे शिक्षण, गृहकर्जाची परतफेड इ. विचारात घेणे महत्त्वाचे आहे. याचा विचार करूनच नवीन योजना करा. >> जर तुमचा कर बचत खर्च 1.5 लाख मर्यादेचा कव्हर करत असेल, तर तुम्हाला संपूर्ण रक्कम गुंतवण्याची गरज नाही. >> तुमची रिस्क प्रोफाइल लक्षात ठेवून, तुम्ही PPF, ELSS Fund, Bank FD आणि NPS इत्यादीसारख्या काही कर बचत गुंतवणुकीत गुंतवणूक करू शकता. Investment Tips : म्युच्युअल फंडातून बंपर कमाई करायचीय? 'या' स्ट्रॅटेजीचा वापर करा उत्तम परतावा आणि लॉक इन कालावधी लक्षात घेऊन तुम्ही कर बचत गुंतवणूक सुरू करू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Income tax, Investment

    पुढील बातम्या