मराठी बातम्या /बातम्या /मनी /करोडपती व्हायचंय? मग आजच सुरू करा फक्त 500 रुपयांची गुंतवणूक

करोडपती व्हायचंय? मग आजच सुरू करा फक्त 500 रुपयांची गुंतवणूक

भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक (Investment) करणं हे फायदेशीर असतं. परंतु, नेमकी कुठे, कशी आणि केव्हा गुंतवणूक करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण यासाठी तज्ज्ञांचा सल्लादेखील घेतात. छोट्या रकमेपासून सुरू केलेली गुंतवणूक काही वर्षांनंतर मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते.

भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक (Investment) करणं हे फायदेशीर असतं. परंतु, नेमकी कुठे, कशी आणि केव्हा गुंतवणूक करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण यासाठी तज्ज्ञांचा सल्लादेखील घेतात. छोट्या रकमेपासून सुरू केलेली गुंतवणूक काही वर्षांनंतर मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते.

भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक (Investment) करणं हे फायदेशीर असतं. परंतु, नेमकी कुठे, कशी आणि केव्हा गुंतवणूक करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण यासाठी तज्ज्ञांचा सल्लादेखील घेतात. छोट्या रकमेपासून सुरू केलेली गुंतवणूक काही वर्षांनंतर मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते.

पुढे वाचा ...

    मुंबई, 01 जून : भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक (Investment) करणं हे फायदेशीर असतं. परंतु, नेमकी कुठे, कशी आणि केव्हा गुंतवणूक करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण यासाठी तज्ज्ञांचा सल्लादेखील घेतात. छोट्या रकमेपासून सुरू केलेली गुंतवणूक काही वर्षांनंतर मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते. हा निधी मुलांचं शिक्षण, घरबांधणी, आजारपण किंवा अडचणीच्या काळात उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकानं अल्प का होईना, पण गुंतवणुकीला वयानुसार लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे. सध्याच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक चांगला पर्याय पुढे येत आहे.

    गुंतवणूक मोठ्या रकमेचीच करावी, असा काही नियम नाही. दर महिन्याला नियमित आणि छोट्या रकमेपासूनही तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आपल्याकडे आहे. छोट्या छोट्या गुंतवणुकीतूनही भविष्यात मोठा फंड तुमच्याकडे तयार होऊ शकतो. तुम्ही घर घेणं, मुलांचं शिक्षण, मुलांचे विवाह किंवा निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन करत असाल, तर या नियोजनाला अंतिम रूप देण्यासाठी या गुंतवणुकीच्या मार्गाचा अवलंब करा.

    काही लोक गुंतवणूक उशिरा सुरू करणार असल्याचं सांगतात, मात्र त्यांच्यासाठी ही वेळ कधीच येत नाही. कारण गुंतवणूक हा विषय ते गांभीर्यानं घेत नाहीत. सध्याच्या काळात जितकी बचत (Savings) गरजेची आहे, तितकीच गुंतवणूकदेखील. परंतु ही गुंतवणूक कुठे करावी, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

    चांगले रिटर्न (Return on Investment) पाहता अनेक आर्थिक सल्लागार गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. कारण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अगदी सोपं आहे. कोणत्याही वयोगटातील लोक म्युच्युअल फंडात एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. कमी वयात गुंतवणूक सुरू करणं हे आपलं लक्ष्य साधण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरू शकतो.

    म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांकडून पैसे जमवतात. त्यातला मोठा भाग शेअर बाजारात (Share Market) गुंतवला जातो. ज्या लोकांना शेअर बाजाराबाबत विशेष माहिती नाही, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड निवडण्याचं गुंतवणूकदारांना पूर्ण स्वातंत्र्य असतं.

    सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग (SIP) हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. या मार्गाने गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. एसआयपीच्या माध्यमातून कोणत्याही डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाऊ शकते. या फंडात कमीत कमी 500 रुपयांपासूनही गुंतवणूक केली जाऊ शकते. याचाच अर्थ यात गुंतवणुकीसाठी फार मोठ्या रकमेची गरज नाही.

    बॅंक खात्यांचे व्याजदार सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक हा एक चांगला पर्याय ठरत आहे. म्युच्युअल फंडात SIP तीन प्रकारे सुरू केले जाऊ शकतात. पहिला प्रकार – म्युच्युअल फंड एजंटद्वारे, दुसरा प्रकार – ब्रोकरमार्फत ऑनलाइन ट्रेडिंग अकाउंट सुरू करून किंवा तिसरा प्रकार म्युच्युअल फंडात थेट गुंतवणूक करणं; मात्र यासाठी म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

    तुम्हाला भविष्यात मोठ्या रकमेची गरज असेल तर दर महिन्याला गुंतवणूक करणं आवश्यक आहे. जसं उत्पन्न वाढेल तशी गुंतवणुकीची रक्कम वाढवणंदेखील गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, एखाद्या 25 वर्षाच्या युवकानं 500 रुपयांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू केली तर दर सहा महिन्यांनी त्याला ही रक्कम 500 रुपयांनी वाढवावी लागेल. याप्रमाणे 5 वर्षांनंतर म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी ही रक्कम 5000 रुपयांपर्यंत वाढेल. तसंच सुरुवातीच्या 2 वर्षांत गुंतवणुकीतून मिळणारे रिटर्न्स पाहता तुमचा यासाठी उत्साह देखील वाढेल.

    एखादी व्यक्ती 30व्या वर्षापासून म्युच्युअल फंडात पुढील 30 वर्षांसाठी 5000 रुपये गुंतवत असेल तर वयाच्या 60 वर्षी त्याला 1,76,49,569 रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. हा आकडा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 12 टक्के व्याजाच्या हिशोबानुसार आहे. एखाद्याला इतक्या गुंतवणूकीवर 15 टक्के व्याज (Interest Rate) मिळालं, तर त्यानुसार, एकूण रिटर्न 3,50,49,103 रुपये असेल. तसंच 10 टक्के व्याजानुसार 5000 रुपये प्रतिमहिना गुंतवणुकीवर 30 वर्षांनंतर एकूण 1,13,96,627 रुपये रिटर्न मिळेल.

    सध्या काही म्युच्युअल फंडांमधून आशादायी लाभ मिळत नसल्याचं चित्र आहे. लहान गुंतवणूकदारांसाठी फंडाची निवड करणं हे अवघड काम आहे. कारण योग्य फंडासाठी भरपूर शोध घेणं आवश्यक आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वंकष विचार आवश्यक आहे. तसंच याबाबत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. कारण म्युच्युअल फंडात गुंतवणूक बाजार जोखमींवर अवलंबून असते.

    First published:
    top videos

      Tags: Investment, Money