Home /News /money /

Investment in Cryptocurrencies: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक कशी करायची? वाचा संपूर्ण प्रोसेस

Investment in Cryptocurrencies: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक कशी करायची? वाचा संपूर्ण प्रोसेस

Cryptocurrency

Cryptocurrency

बिटकॉइन, इथरियम, डॉजकॉइन, कार्डानो यासह बर्‍याच करन्सींमध्ये 30 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. अनेक गुंतवणूकदार या पडझडीत गुंतवणुकीची संधी शोधत आहेत. मात्र यात गुंतवणूक कशी करावी हा अनेक गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे.

    मुंबई, 29 जानेवारी : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक (Investment in Cryptocurrencies) केलेल्यांना आजवर मिळालेले रिटर्न अविश्वसनीय आहेत. कमी गुंतवणुकीत भरघोस रिटर्नमुळे हे एक आकर्षण बनलं आहे. गेल्या काही दिवसात मात्र बिटकॉइनसह (bitcoin) बहुतेक प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण होत आहे. बिटकॉइन, इथरियम, डॉजकॉइन, कार्डानो यासह बर्‍याच करन्सींमध्ये 30 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. अनेक गुंतवणूकदार या पडझडीत गुंतवणुकीची संधी शोधत आहेत. त्याच वेळी, नवीन गुंतवणूकदारांमध्ये क्रिप्टोकडे अजूनही आकर्षण आहे. मात्र यात गुंतवणूक कशी करावी हा अनेक गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई सारख्या एक्सचेंजेसवर खरेदी-विक्री केले जातात, त्याचप्रमाणे क्रिप्टो एक्स्चेंजवर बिटकॉइन सारख्या क्रिप्टोची खरेदी-विक्री केली जाते. म्हणजेच तुम्हाला बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही कोणत्याही एक्सचेंजमध्ये जाऊन सहजपणे पैसे कमवू शकता. त्यात पैसे टाकता येतात. पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा दरमहा 1411 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपये गुंतवणूक पद्धत वझीरएक्स (WazirX), कॉईनडेक्स (Coindex), जेबपे (Zebpay), कॉईन स्विच कुबेर (Coin Switch Kuber) आणि युनोकॉईन (UnoCoin) यांसारख्या एक्सचेंजच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक तुम्ही करु शकता. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रथम तुम्हाला एक्सचेंजच्या साइटवर जावे लागेल आणि वैयक्तिक तपशीलांद्वारे नोंदणी करावी लागेल. म्हणजेच डिमॅट खात्याप्रमाणे येथेही तुमचे खाते उघडावे लागेल. त्यानंतर तुम्ही त्या खात्यातून गुंतवणूक करू शकता. काय आहे प्रोसेस? >> क्रिप्टो करन्सी वेबसाइटला भेट देऊन साइन अप करा. >> त्यानंतर ई-मेल व्हेरिफिकेशननंतर सिक्युरिटी पेज येईल ज्यामध्ये अॅप, मोबाईल एसएमएस किंवा नो सिक्युरिटी पर्याय निवडण्याचा पर्याय येईल. >> ओके केल्यानंतर, तुम्हाला देश निवडण्याचा आणि केवायसी निवडण्याचा पर्याय मिळेल. केवायसी अंतर्गत, एखाद्याला वैयक्तिक आणि कंपनी यापैकी एक निवडावा लागतो, जो डीफॉल्ट वैयक्तिक आहे. >> केवायसीसाठी, तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, पॅन कार्ड, आधारच्या तपशीलांसह पॅन कार्डचा फोटो (ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट), आधार कार्डच्या पुढील आणि मागील बाजूसह सेल्फी अपलोड करावे लागतील. >> खाते पडताळनीनंतर, तुम्ही क्रिप्टो खरेदी करू शकता आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे देऊ शकता. येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार? चेक करा गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करण्यापूर्वी क्रिप्टोकरन्सीचा अभ्यास करणे आणि समजून घेणे खूप महत्वाचे आहे. क्रिप्टो मार्केटमधील येऊ घातलेल्या जोखमींबद्दल जागरूक असल्याची खात्री करा. सुरुवातीला किती गुंतवणूक करायची याचा निर्णय व्यक्तीच्या गुंतवणुकीच्या प्रमाणावर आधारित असावा. कमी गुंतवणुकीपासून सुरुवात करा.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cryptocurrency, Digital currency, Investment

    पुढील बातम्या