मुंबई: कोरोनानंतर अनेक जण डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. त्यामुळे नोटा वापरण्याची सवय आणि प्रमाण दोन्ही कमी झालं आहे. पटकन आपल्याकडे 500 किंवा 2000 रुपयांची नोट आली तर आता खरी आहे की खोटी हे तुम्हाला कसं कळणार? जेव्हा ती नोट दुकानात किंवा बँकेत दिली जाईल तेव्हाच समोराचा जर तुम्हाला म्हणाला तर ती खोटी आहे तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. खोट्या नोटा तुमच्याकडे आल्या तर त्या कशा ओळखायच्या याबाबत RBI ने नियम सांगितले आहेत.
500 आणि 2000 रुपयांच्या नोटा कशा ओळखायच्या याबाबत RBI ने काही खाणाखुणा सांगितल्या आहेत. 17 वेगवेगळ्या गोष्टी पडताळून तुम्ही नोट खरी आहे की नाही याची माहिती घेऊ शकता. यामध्ये अगदी छोटं अंतर असतं पण ते कळणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं.
कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या?
- 500 किंवा 2 हजार रुपयाची नोट तुम्ही लाईट समोर पकडली तर तुम्हाला 500 रुपये लिहिलेलं दिसेल.
- डोळ्यासमोर 45 डिग्रीमध्ये नोट पकडली तर तुम्हाला 500 रुपये लिहिलेलं दिसेल
- देवनागरीमध्ये 500 किंवा 2000 रुपये लिहिलेलं असेल
- महात्मा गांधी यांचा फोटो एकदम सेंटरमध्ये दिसेल
- भारत आणि India लेटर्स लिहिलेले दिसतील
- जर तुम्ही ही नोट हलक्या हाताने दुमडली तर सिक्युरिटी थ्रीडीच्या रंगाचा रंग हिरवा ते निळा असा बदलताना दिसेल
- वर्नर सिग्नेचर, गॅरेंटी क्लॉज, मिस क्लॉज आणि RBI लोगो उजव्या बाजूला देण्यात आला आहे
तुमच्याकडेही 2000 रुपयांची नोट असेल तर ही गोष्ट माहितीच हवी, RBI चा इशारा
- महात्मा गांधीजींचा फोटो तुम्हाला पलिकडच्या बाजूला वॉटरमार्कमध्ये छापलेला दिसेल
- नोटेच्या वर डाव्या बाजूला आणि खाली उजव्या बाजूने नंबर वाढताना दिसतात
- ५०० रुपयांच्या नोटेवर रंगही बदलतो
- याशिवाय उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे
- उजव्या बाजूला सर्कल बॉक्स आहे ज्यामध्ये 500 लिहिलेलं आहे. राइट आणि लेफ्ट साइडला 5 ब्लीड लाइन्स आहेत
- नोटेच्या छपाईचे वर्ष लिहिले आहे.
- स्वच्छ भारताचा लोगो घोषवाक्यासह छापलेला आहे.
- मध्य बाजूला भाषेचे पॅनेल आहे.
- भारतीय ध्वज असलेल्या लाल किल्ल्याची चित्र प्रिंट आहे.
- देवनागरीच्या 500 प्रिंट आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Money fraud, Rbi, Rbi latest news