इंटरव्ह्यूमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका, नाही तर जाईल नोकरीची संधी

इंटरव्ह्यूमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका, नाही तर जाईल नोकरीची संधी

Jobs, Interview for Jobs - सध्या नोकरीमध्ये स्पर्धा खूप वाढलीय. नोकरी मिळणं खूप कठीण झालंय

  • Share this:

मुंबई, 29 जून : सध्या नोकरीमध्ये स्पर्धा खूप वाढलीय. नोकरी मिळणं खूप कठीण झालंय. अशात तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये चुका केल्यात तर नोकरी गेलीच म्हणून समजा. तुम्ही कंपनीत इंटरव्ह्यूला जाताना छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे नोकरी मिळण्याच्या शक्यता वाढतात. अशा वेळी टेन्शन न घेता स्वत:कडे लक्ष द्यावं.

इंटरव्ह्यू दरम्यान तुमचा लूक, बोलण्याची पद्धत, बसायची स्टाइल इत्यादी गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगतोय ज्या पाळल्यात तर तुमची निवड होऊ शकते.

भारतीय नौदलात 2700 व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

मुलाखतीसाठी दिलेली वेळ पाळा. दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं आधी पोचा. वेळ पाळणं खूप महत्त्वाचं आहे.

पोशाखावरून तुमचं व्यक्तिमत्त्व ठरतं. इंटरव्ह्यूला जाताना फाॅर्मल कपडे घाला. भडक पोशाख शक्यतो टाळा.

इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आत्मविश्वासानं द्या. माहीत नसेल तर नाही म्हणा. पण चुकीची उत्तरं देऊ नका.

SBI च्या डेबिट कार्डानं बुक करा विमानाचं तिकीट, मिळवा 'इतका' डिस्काउंट

ज्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जाणार त्याची पूर्ण माहिती घ्या. कंपनीच्या छोट्या छोट्या गोष्टींचीही माहिती ठेवा.

उत्तरं देताना उगाच अति बोलत बसू नका. थोडक्यात उत्तरं द्या. तुम्हाला पुढे जाऊन काय व्हायचंय तेही सांगा.

काय असतो Google Tax? कसा होईल तुमच्यावर परिणाम?

झपाट्याने वाढत चालेल्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनच्या काळात मोठ्या कंपनीमध्ये प्रोफेशनल लोकांची खूप गरज असते. असे प्रोफेशनल लोक ज्यांना मोबाइल इंटरनेट आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी याबद्दल संपूर्ण माहीत असते. सध्या असेच लोक जगाच्या वेगळे करू शकतात असं समजलं जातं. म्हणूनच जर डिजीटल युगात तुम्ही नोकरी शोधत आहात तर काही स्किल्सची माहिती असणंही आवश्यक आहे.

पावसात विजेच्या खांबाला हात लावू नका, सुरतमध्ये काय घडलं पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jun 29, 2019 07:34 PM IST

ताज्या बातम्या