मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Loan on PAN Card: पॅन कार्डवरून मिळवू शकता वैयक्तिक कर्ज, प्रोसेस आहे खूपच सोपी

Loan on PAN Card: पॅन कार्डवरून मिळवू शकता वैयक्तिक कर्ज, प्रोसेस आहे खूपच सोपी

Loan on PAN Card: पॅन कार्डवरून मिळवू शकता वैयक्तिक कर्ज, प्रोसेस आहे खूपच सोपी

Loan on PAN Card: पॅन कार्डवरून मिळवू शकता वैयक्तिक कर्ज, प्रोसेस आहे खूपच सोपी

Loan on PAN Card: आजच्या काळात कर्ज घेणं फार अवघड काम नाही. जर तुमची कागदपत्रं बरोबर असतील तर कर्ज सहज मिळतं. परंतु कधीकधी कर्ज मिळणं कठीण होतं. पॅन कार्डवरून पर्सनल लोन मिळविण्यासाठी ग्राहकांना काही कागदपत्रे बँकेकडे सादर करणं आवश्यक आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 14 ऑगस्ट : देशात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी (Financial transaction) पॅन कार्ड (Pan Card) अनिवार्य आहे. पॅन कार्ड हा कायमस्वरूपी 10 अंकी क्रमांक असतो, जो आयकर विभागाकडून जारी केला जातो. पॅनकार्डशिवाय तुम्ही बँकांमधून कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला पॅन कार्डवर बँकांकडून कर्ज (Personal Loan on Pan Card) मिळू शकते. पॅन कार्ड हे आजच्या काळात आपल्या ओळखीचं सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे. याशिवाय तुम्ही बँक खातं उघडू शकणार नाही किंवा आयकर रिटर्न भरू शकणार नाही. पॅन कार्डवर कर्ज कसे मिळवायचे? तसं पाहिलं तर आजच्या काळात कर्ज घेणं अवघड काम नाही. जर तुमची कागदपत्रं बरोबर असतील तर कर्ज सहज मिळतं. पण काही वेळा कर्ज मिळण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. बहुतांश बँका पॅन कार्डवर 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देतात. पॅन कार्डवर कर्ज देण्यापूर्वी, कोणतीही बँक किंवा NBFC ग्राहकांचा CIBIL स्कोअर तपासते. यावरून कर्ज परत करण्याच्या बाबतीत ग्राहकांची नोंद काय आहे, हे कळते. कोणत्याही सिक्युरिटीशिवाय कर्ज उपलब्ध- तुम्ही तुमच्या पॅन कार्डद्वारे 50,000 रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज सहजपणे घेऊ शकता. बँका तुम्हाला कोणत्याही सिक्युरिटीशिवाय 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देतात. याचा अर्थ तुम्हाला बँकेकडे काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. परंतु त्यासाठी तुमचा CIBIL स्कोर चांगला असावा. तरच तुम्हाला हे कर्ज मिळू शकेल. वैयक्तिक कर्जाचा व्याजदर गृहकर्ज, कार कर्जापेक्षा जास्त असतो आणि तो असुरक्षित श्रेणीत येतो. या कारणास्तव बँका पॅन कार्डद्वारे कर्जाच्या स्वरूपात जास्त रक्कम देत नाहीत. हेही वाचा- दरमाह फक्त 55 रुपये जमा करा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन; काय आहे 'ही' सरकारी योजना?
 ही कागदपत्रं आहेत आवश्यक -
जर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला काही कागदपत्रं बँकेत जमा करावी लागतील. यामध्ये तुमच्या कामाचा अनुभव देखील समाविष्ट आहे. जर तुम्हाला किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असेल तरच तुम्हाला पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज मिळेल. तुम्ही नोकरी किंवा तुमचा व्यवसाय करत असाल तरच तुम्हाला पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज मिळू शकेल. परंतु त्यासाठी तुमचा CIBIL स्कोर चांगला असायला हवा.
First published:

Tags: Loan, Pan card

पुढील बातम्या