कोरोनावरील इलाजासाठी कसा मिळवावा विम्याचा लाभ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कोरोनावरील इलाजासाठी कसा मिळवावा विम्याचा लाभ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या विमा रकमेवर क्लेम केला जाऊ शकतो. तसंच उपचारासाठी देखील विम्याद्वारे क्लेम करता येतो. या विमा क्लेमचा अर्ज करताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : आरोग्य विमा (Health Insurance) हा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. याद्वारे वैद्यकीय उपचारासाठी झालेल्या मोठ्या खर्चाचे ओझे पेलणे सोपे जाते. सध्याच्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात तर आरोग्य विम्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. तुम्ही किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं आरोग्य विमा घेतला असेल आणि दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या विमा रकमेवर क्लेम केला जाऊ शकतो. तसंच उपचारासाठी देखील विम्याद्वारे क्लेम करता येतो. या विमा क्लेमचा अर्ज करताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

दोन प्रकारचे विमा क्लेम -

टीव्ही9 ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सामान्यत: दोन प्रकारचे आरोग्य विमा क्लेम असतात. पहिला कॅशलेस क्लेम (Cashless Claim) आणि दुसरा रिएम्बर्समेंट क्लेम (Reimbursement Claim).

कॅशलेस क्लेम -

विमाधारकानं कॅशलेस क्लेमचा पर्याय निवडला असेल, तर रुग्णाला कॅशलेस सुविधेचा लाभ मिळेल. त्याअंतर्गत विमा कंपनीशी संलग्न असलेल्या निवडक रुग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार केल्यास विमा पॉलिसीच्या अटींनुसार, देय असलेल्या उपचार खर्चाची काही रक्कम विमा कंपनी प्रदान करेल. कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्यासाठी विमा किंवा टीपीए डेस्कवर ओळखपत्र द्यावे लागेल. यानंतर रुग्णालय आणि विमा कंपनी यांच्यात प्रक्रिया सुरू होईल. आयआरडीएच्या नवीन नियमानुसार, कोरोनावरील उपचारांचा देखील कॅशलेस उपचारांच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

(वाचा - कोरोना रुग्णांना Ivermectin देऊ नका; भारतात औषधाचा वापर, WHO ने केलं सावध)

रिएम्बर्समेंट क्लेम -

रिएम्बर्समेंट क्लेममध्ये (Reimbursement Claim) विमाधारकानं विमा कंपनीशी संलग्न नसलेल्या रुग्णालयात उपचार घेतले असतील किंवा घेत असेल, तर उपचारा दरम्यान होणारा खर्च ग्राहक स्वतः देऊन नंतर त्यासाठी विमा कंपनीकडे दावा करू शकतो. असे दावे सहसा 5 दिवसांच्या आत निकाली काढले जातात.

कॅशलेस क्लेमचा प्रक्रिया -

कॅशलेस क्लेमसाठी अर्ज करण्यासाठी विमाधारकाला रुग्णालयाच्या विमा डेस्कशी (Insurance Desk) संपर्क साधावा लागेल. इथे विमाधारकाला अर्ज दिला जातो. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यावर सही असणं आवश्यक आहे. तो अर्ज भरल्यानंतर विमा कंपनीकडे पाठवला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर विमा कंपनी उपचार खर्चाची भरपाई करेल. उपचार करण्यापूर्वी 4 ते 7 दिवस आधीही मंजुरी घेणं आवश्यक आहे. विमाधारकाला विमा कंपनीद्वारे जारी करण्यात आलेलं आणि विमा डेस्कनं भरलेलं पूर्व-मान्यता पत्र, विमा कंपनीनं दिलेलं ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड याच्या फोटो कॉपी द्याव्या लागतील. उपचार झाल्यानंतर मूळ बिल आणि उपचारासंबधीचे प्रमाणपत्र रुग्णालयात सादर करावे लागेल.

(वाचा - Virafin : कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार औषध; Zydus cadila ने जारी केली किंमत)

एखाद्या विमाधारकास आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करावं लागत असल्यास विमाधारक ग्राहक सेवा केंद्र किंवा चॅटबॉटच्या सुविधेद्वारे विमा कंपनीशी संपर्क साधू शकतो. यामुळे नोंदणीकृत रुग्णालयात दाखल होण्यास मदत होईल.

(वाचा - Explainer : कोविड रुग्णांना होणारा Mucormycosis आजार नेमका आहे तरी काय?)

रिएम्बर्समेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे -

रिएम्बर्समेंट क्लेम करण्यासाठी, विमाधारकाला विमा कंपनीच्या वेबसाइटवरून आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करावी लागतील किंवा विमा कंपनीच्या कार्यालयातून कागदपत्रे घ्यावी लागतील. या कागदपत्रांसह ग्राहकानं मूळ वैद्यकीय बिल आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणंही आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये क्लेम फॉर्म, बँक स्टेटमेन्ट्स, आयडी कार्ड्स, हॉस्पिटल डिस्चार्ज पेपर, चेक अँड डायाग्नोसिस रिपोर्ट्स आणि बिले, हॉस्पिटल आणि फार्मसीची बिलं तसंच पेमेंट रिसीट आणि प्रिस्क्रिप्शन यांचा समावेश आहे. अपघात झाल्यानं रुग्णालयात दाखल झाल्यास पोलिस तक्रारीची अर्थात एफआयआरची एक प्रत विमा कंपनीला देणं आवश्यक आहे.

First published: May 12, 2021, 10:53 PM IST

ताज्या बातम्या