मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्या सेविंग्स अकाउंटमधील पैशांवर मिळवा FD एवढं व्याज; बँकेच्या 'या' सुविधेचा फायदा घ्या

तुमच्या सेविंग्स अकाउंटमधील पैशांवर मिळवा FD एवढं व्याज; बँकेच्या 'या' सुविधेचा फायदा घ्या

Bank Rule : बँकेच्या बचत खात्यात 'स्वीप-आउट' आणि 'स्वीप-इन'ची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे, तुम्ही तुमच्या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर सहजपणे अधिक व्याज मिळवू शकता.

Bank Rule : बँकेच्या बचत खात्यात 'स्वीप-आउट' आणि 'स्वीप-इन'ची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे, तुम्ही तुमच्या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर सहजपणे अधिक व्याज मिळवू शकता.

Bank Rule : बँकेच्या बचत खात्यात 'स्वीप-आउट' आणि 'स्वीप-इन'ची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे, तुम्ही तुमच्या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर सहजपणे अधिक व्याज मिळवू शकता.

    मुंबई, 14 ऑगस्ट : तुमचं बँकेत बचत खातं असेल तर त्या खात्यातील पैशांवर तुम्हाला ठराविक व्याज तुम्हाला मिळत असेल. मात्र हे व्याज फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा मिळते. परंतु बँका काही विशेष सुविधा देतात ज्याद्वारे बचत खात्यात जास्त व्याज मिळू शकते. तुम्हाला तुमच्या बचत खात्यातील रकमेवर अधिक नफा मिळू शकतो. लोक फिक्स डिपॉझिट ऐवजी बचत खात्यात पैसे ठेवतात जेणेकरून त्यांना जेव्हा जेव्हा रोख आवश्यक असेल तेव्हा ते काढू शकतात. FD मध्ये हे शक्य नाही. बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर अधिक व्याज कसे मिळवायचे याबद्दल जाणून घेऊया. बँकेच्या बचत खात्यात 'स्वीप-आउट' आणि 'स्वीप-इन'ची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे, तुम्ही तुमच्या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर सहजपणे अधिक व्याज मिळवू शकता. बँका ही सुविधा बचत खात्यात देतात, ज्यामध्ये जास्तीची रक्कम आपोआप FD मध्ये जमा केली जाऊ शकते. जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर ही रक्कम तुम्ही केव्हाही काढू शकता. बचत खात्यात जमा केलेले पैसे जेव्हा FDमध्ये जातात तेव्हा त्यावर जास्त व्याज मिळते. लिंक केलेल्या एफडीमध्ये, तुमच्या रकमेवर तुम्हाला जास्त व्याज मिळेल याची खात्री असते. सामान्य बचत खात्याच्या तुलनेत हा दर जास्त आहे. त्यामुळे उत्पन्न वाढते. सरकारकडून विवाहित जोडप्यांना मिळतात 72000 रुपये, तुम्हीही घेऊ शकता लाभ या योजनेची खासियत काय? या सुविधेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्यातील अतिरिक्त पैशांचा पुन्हा पुन्हा मागोवा घ्यावा लागणार नाही. जेव्हा तुम्ही बँकेला बचत खात्याचे FDमध्ये रूपांतरित करण्याच्या सूचना द्याल तेव्हा ही प्रक्रिया आपोआप पूर्ण होईल. तुम्हाला बँकेला कळवावे लागेल की तुम्हाला ही सुविधा तुमच्या बचत खात्यावर घ्यायची आहे. यानंतर, तुम्हाला या सुविधेसाठी किती अतिरिक्त रक्कम वापरायची आहे हे ठरवावे लागेल आणि त्याबद्दल बँकेला सांगावे लागेल. साधारणपणे बँकांमध्ये त्याची मर्यादा 10 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत असते. Rakesh Jhunjhunwala Death: राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांचं 4ं6 हजार कोटींची साम्राज्य कोण सांभाळणार? एफडीच्या मॅच्युरिटीच्या अटी जेव्हा तुमच्या बँक खात्यात तुम्ही ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे असतील, तेव्हा बँक आपोआप ती अतिरिक्त रक्कम FD मध्ये टाकेल. या एफडीचा मॅच्युरिटी कालावधी 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत असू शकतो. जेव्हा ही FD मॅच्युअर होते, तेव्हा ती आपोआप रिन्यू देखील होते. ही सुविधा महिला आणि मुलांच्या विशेष खात्याशीही जोडली जाऊ शकते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Saving bank account

    पुढील बातम्या