मराठी बातम्या /बातम्या /मनी /नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! EPFO खात्यामध्ये अशाप्रकारे घरबसल्या सक्रीय करा तुमचा UAN

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! EPFO खात्यामध्ये अशाप्रकारे घरबसल्या सक्रीय करा तुमचा UAN

नोकरदार वर्गासाठी UAN अत्यंत महत्त्वाचा आहे. या क्रमांकाच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमच्या  PF खात्यासंदर्भातील माहिती मिळवता येते. जाणून घ्या याच UAN बाबत सविस्तर माहिती..

नोकरदार वर्गासाठी UAN अत्यंत महत्त्वाचा आहे. या क्रमांकाच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमच्या PF खात्यासंदर्भातील माहिती मिळवता येते. जाणून घ्या याच UAN बाबत सविस्तर माहिती..

नोकरदार वर्गासाठी UAN अत्यंत महत्त्वाचा आहे. या क्रमांकाच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमच्या PF खात्यासंदर्भातील माहिती मिळवता येते. जाणून घ्या याच UAN बाबत सविस्तर माहिती..

नवी दिल्ली, 06 डिसेंबर: जर तुम्ही नोकरदार वर्गापैकी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. UAN माहित असणं आणि तो सक्रीय असणं अत्यंत गरजेचं आहे. कर्मचारी भविष्य निधी निर्वाह संघटना (EPFO) प्रोव्हिडंट फंड (PF) खातेधारकांना यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ही सुविधा देतं. तुम्ही कितीही नोकऱ्या बदलल्या तरी हा क्रमांक तोच राहतो. मात्र काही पीएफ खातेधारक असे आहेत की ज्यांना UAN मिळाळा तर आहे, पण त्यांनी तो Activate केला नाही आहे. नोकरदार वर्गासाठी UAN अत्यंत महत्त्वाचा आहे. या क्रमांकाच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमच्या  PF खात्यासंदर्भातील माहिती मिळवता येते. जर तुम्हाला तुमचा UAN माहित नसेल तर अशाप्रकारे EPFO च्या वेबसाइटवरून माहित करता येईल

UAN म्हणजे काय?

यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (Universal Account Number) मुळे पीएफ खाते बंद करणं किंवा ट्रान्सफर करणं  या समस्या दूर झाल्या आहेत. एकदा तुमचा UAN सक्रीय झाला की तुमचं काम  सोपं होईल. या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन पीएफ ट्रान्सफर, बॅलन्स चेक आणि विड्रॉलची सुविधा मिळवू शकता. तुमची जुनी आणि नवीन सर्व खाती या एकाच UAN च्या अंतर्गत दिसतील.

UAN नंबर कसा Activate कराल?

-तुमच्या सॅलरी स्लीपवर एक UAN नंबर येतो. या नंबरसाठी सर्वात प्रथम तुम्हाला www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तुमच्या पगारातून जर EPFO कापला जात असेल तर आपलं EPFO अकाऊंट हे कंपनीकडून काढलं गेलं आहे.

(हे वाचा-तुमच्याकडे Rupay Card असल्यास मिळवा जबरदस्त ऑफर्स! शॉपिंगवर मिळेल कमाल Discount)

-त्यानंतर Our Services मध्ये For Employees पर्याय निवडा. त्यानंतर UAN/ Online Services पर्यायावर क्लिक करा.

-याठिकाणी तुम्ही UAN पोर्टलवर जाल. तुम्हाला तिथे रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक आणि  PF मेंबर ID दाखल करावा लागेल.

-त्यानंतर Get authorization PIN वर क्लिक करा. त्यानंतर PIN नंबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल. हा ओटीपी दाखल करून  Validate OTP वर क्लिक करा. यानंतर तुमचा UAN अॅक्टिव्हेट होईल.

अशाप्रकारे माहित करून घ्या UAN स्टेटस

-तुमच्या UAN चे स्टेटस माहित करून घेण्यासाठी http://uanmembers.epfoservices.in/check_uan_status.php या लिंकवर जा.

-यानंतर जे पेज येईल त्यावर आवश्यक माहिती भरावी लागेल. यामध्ये राज्याचे नाव, शहराचे नाव, एस्टाब्लिशमेंट कोड आणि पीएफ खाते क्रमांक दाखल करावा लागेल.

(हे वाचा-Post Office च्या या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुप्पट रिटर्न! वाचा सविस्तर)

-यानंतर तुम्ही चेक स्टेटस वर क्लिक केल्यानंतर एक मेसेज दिसेल. त्यामध्ये लिहलं असेल की तुम्हाला UAN क्रमांक मिळाला आहे की नाही. अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही तुमच्या कंपनीच्या HR शी संपर्क करू शकता किंवा EPFO पोर्टलवर जाऊन माहिती मिळवू शकता.

First published:

Tags: Money, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal