फक्त 7 मिनिटांत असं भरता येतं ITR Return, येत्या 7 दिवसांत नाही भरले तर होईल दंड

31 ऑगस्टच्या डेडलाइनपर्यंत ITR भरला नाही तर त्यासाठी किमान 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 08:05 PM IST

फक्त 7 मिनिटांत असं भरता येतं ITR Return, येत्या 7 दिवसांत नाही भरले तर होईल दंड

मुंबई, 24 ऑगस्ट : इन्कम टॅक्स रिटर्न भरायची शेवटची मुदत 31 ऑगस्ट आहे. आता यासाठी शेवटचे 7 दिवस राहिले आहेत. या मुदतीत ITR Return भरले नाही, तर किमान 5000 रुपयांचा दंड लागणार आहे. या आर्थिक वर्षाचे इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 ऑगस्टची डेडलाइन आहे. म्हणजेच ITR भरण्यासाठी फक्त 10 दिवस उरले आहेत. डेडलाइन जवळ आल्याच्या अगदी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळायची असेल तर लवकरात लवकर ITR भरा, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

फक्त 7 मिनिटांत भरा ITR

इनकम टॅक्स विभागाने कर भरणाऱ्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. करदाते ई फायलिंगच्या माध्यमातून रिटर्न फाइल करू शकतात. ही सर्व्हिस https://www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत पोर्टलवर सुरू आहे. याला e-filing Lite सुविधा असं नाव देण्यात आलं आहे.

31 ऑगस्टच्या डेडलाइनपर्यंत ITR भरला नाही तर त्यासाठी दंड भरावा लागेल. 31 ऑगस्ट 2019 नंतर 31 डिसेंबर 2019 पर्यंत ITR भरला तर त्यासाठी 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही 1 जानेवारी 2020 पासून 30 मार्च 2020 पर्यंत ITR भरला तर 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. ज्यांचं उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना उशिराचा दंड म्हणून 1 हजार रुपये भरावे लागतील.

वाचा - सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO

Loading...

ITR भरल्यानंतर तो व्हेरिफाय करण्याचीही गरज असते. जर व्हेरिफाय केलं नाही तर ते अधिकृत धरलं जात नाही. रिटर्न्स भरल्यानंतर आपण आधार OTP च्या माध्यमातून व्हेरिफाय करू शकतो. त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडलेला असायला हवा. तुमच्या मोबाइल नंबरवर OTP आल्यानंतर तो इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर टाका. त्यानंतर तुमचे रिटर्न्स व्हेरिफाय होतील. याशिवाय तुम्ही बँकेचं ATM, DMAT अकाउंट आणि नेट बँकिंगच्या माध्यमातूनही ITR व्हेरिफाय करू शकता.

वाचा - नापास झालेल्या या तरुणाने छोट्याशा कल्पनेतून उभी केली 25000 कोटींची Zomato

तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर ITR भरणं आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाची मर्यादा 3 लाख आणि 80 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे.

========================================================================

सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: incom tax
First Published: Aug 24, 2019 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...