मराठी बातम्या /बातम्या /मनी /

NPS खातं मुदतीआधी बंद करता येतं का, त्यावरून पैसे कसे काढायचे?

NPS खातं मुदतीआधी बंद करता येतं का, त्यावरून पैसे कसे काढायचे?

NPS तीन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिट पर्याय ग्राहकांना ऑफर करते.

NPS तीन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिट पर्याय ग्राहकांना ऑफर करते.

NPS तीन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिट पर्याय ग्राहकांना ऑफर करते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही सरकारी योजना आहे. ही अशा व्यक्तींसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आहे, ज्यांना त्यांचे सेवानिवृत्तीचं वय झाल्यावर म्हणजे 60 वर्षांनंतर चांगलं पेन्शन हवं आहे. ही योजना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीद्वारे (PFRDA) मॅनेज केली जाते.

द मिंटने दिलेल्या वृत्तानुसार NPS तीन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिट पर्याय ग्राहकांना ऑफर करते. त्यामध्ये योजना मॅच्युअर होण्याआधी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेणं, याचा समावेश आहे. हा पर्याय सदस्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी योजनेतून बाहेर पडण्याची परवानगी देतं. तसंच नॉर्मल एक्झिट सदस्यांना 60 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त काळाने एक्झिट घेण्याची परवानगी देतं. तसंच तिसरा पर्याय हा अनपेक्षित मृत्यूनंतर योजनेतून बाहेर पडू देतो. यामध्ये सदस्यांना नॉर्मल एक्झिट 60 वर्षांपेक्षा आधी म्हणजेच सुपरॅन्युएशनपूर्वी बाहेर पडण्याची परवानगी मिळते.

अमित सिन्हा, ग्रुप हेड, सोशल सिक्युरिटी अँड वेल्फेअर, प्रोटिन eGov टेक्नॉलॉजीज लिमिटेड (पूर्वीचे NSDL eGovernance Infrastructure Limited) यांनी मिंटचे विपुल दास यांना दिलेल्या मुलाखतीत NPS योजनेमधून बाहेर पडण्याबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यांनी NPS मधून बाहेर पडण्याबद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एनपीएस योजनेचा लाभ घेणारे आणि घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधील एक्झिट नियम समजून घेणं सोपं होईल.

प्रश्न 1. वयाची 60 वर्षं पूर्ण केल्यानंतर NPS मधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी कोणते फॉर्म आणि कागदपत्रं आवश्यक आहेत? टियर 1 आणि टियर 2 अकाउंटसाठी सबमिशन प्रोसेस आणि अटी काय आहेत?

एनपीएसमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सदस्यांना वयाच्या 60 वर्षांपर्यंत वाट पाहावी लागत नाही. वयाची 60 वर्षे पूर्ण होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया सुरू होते. प्रोटिन सीआरए सबस्क्राइबरला त्यांच्या रिटायरमेंटबद्दल आणि 60 वर्षांनंतर उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांबद्दल, सबस्क्रायबरने NPS मधून बाहेर पडण्याचा आणि पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास काय करावं लागेल, याबाबत अलर्ट पाठवून सूचना देतं. यामुळे सबस्क्रायबरला पुढच्या प्रोसेसची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

NPS सबस्क्रायबर्सकडे खालील पर्याय आहेत.

1. सबस्क्रायबर्स एकरकमी पैसे काढणं किंवा उर्वरित रक्कम अॅन्युटाइझ करणं, हा पर्याय निवडू शकतो. सबस्क्रायबरला जमा झालेल्या कॉर्पसच्या किमान 40% वार्षिक रक्कम ठेवावी लागते आणि 60% पैसे एकरकमी म्हणून काढता येतात. राष्ट्रीय पेन्शन सिस्टिम (एनपीएस) अंतर्गत अ‍ॅन्युइटी म्हणजे पेन्शनच्या उद्देशाने गुंतवणूक केलेल्या रकमेचे ठराविक काळाने हप्ते मिळावेत म्हणून त्याची विभागणी करतात. या प्रक्रियेला अ‍ॅन्युइटायझेशन म्हणतात.

2. सबस्क्रायबर एकरकमी पैसे किंवा अॅन्युइटी काढणं किंवा 75 वर्षांपर्यंत दोन्हीपैकी एक पोस्टपोन करण्याचा पर्याय निवडू शकतो.

3. सबस्क्रायबर्स अकाउंट वयाच्या 75 वर्षापर्यंत सुरू ठेवू शकतात.

किमान 40% ची अ‍ॅन्युटायझेशन करणं आणि उर्वरित 60% कॉर्पस एकरकमी काढणं, हा डिफॉल्ट पर्याय असला तरी एनपीएस सब्सक्रायबरला जमा झालेल्या रकमेच्या 100% पर्यंत अ‍ॅन्युइटायझेशन करण्याचा पर्याय आहे. असं केल्यास पेन्शन जास्त मिळते.

सध्याच्या काळातील सर्वसाधारण मृत्यूचं वय पाहता, एखाद्या व्यक्तीची आपल्या पार्टनरसोबत रिटायरमेंट लाइफ तीन दशकांहून अधिक असण्याची शक्यता आहे. या उद्देशासाठी आणि महागाईचा दर लक्षात घेता एक चांगलं स्थिर उत्पन्न अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानुसार जमा झालेल्या निधीच्या 100% च्या अ‍ॅन्युइटायझेशन निवडणार्‍या सबस्क्रायबरला जास्त पेन्शन रक्कम मिळू शकेल, असं अमित सिन्हा म्हणाले.

एनपीएसमधील आणखी एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे सबस्क्रायबर्स अ‍ॅक्युमुलेशन फेजमध्ये आपला पेन्शन फंड मॅनेजर (PFM) निवडू शकते. तसेच अॅन्युइटी निवडण्याच्या संदर्भात डी- अ‍ॅक्युमुलेशन फेजमध्ये फ्लेक्झिबिलीटी आहे. त्यानुसार अॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर सबस्क्रायबर्सना अॅन्युइटी प्रदान करेल.

डी- अ‍ॅक्युमुलेशन म्हणजेच NPS मधून बाहेर पडणे ही एक अखंड प्रक्रिया असून ती पेपरलेस पद्धतीने पूर्णपणे ऑनलाइन केली जाते. सबस्क्रायबरला सिस्टममध्ये फक्त ऑनलाइन एक्झिट रिक्वेस्ट टाकावी लागेल आणि त्यानंतर स्कॅन केलेली केवायसी डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तसंच रिक्वेस्टवर डिजिटल सही करावी लागेल. तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंट्सची प्रत्यक्ष कॉपी द्यावी लागणार नाही. यामुळे सबस्क्रायबरचा बराच वेळ आणि मेहनत वाचते, तसेच कोणत्याही मध्यस्थावर अवलंबून राहावं लागत नाही.

सबस्क्रायबर्सकडे सक्रिय टियर-2 अकाउंट असेल तर टियर 1 अकाउंटसह ते आपोआप बंद होते. टियर 2 बंद करण्यासाठी वेगळी रिक्वेस्ट करावी लागत नाही.

प्रश्न 2. एनपीएसमधून बाहेर पडल्यावर कोणते फायदे मिळतात?

एनपीएसमधून बाहेर पडल्यावर सबस्क्रायबर कर लाभ घेऊ शकतात. एकूण जमा झालेल्या पेन्शन रकमेच्या 60% पर्यंत एकरकमी पैसे काढणे टॅक्स फ्री आहे. तसंच, अॅन्युइटीच्या खरेदीसाठी वापरलेले पैसे टॅक्स फ्री आहेत. पेन्शन म्हणून वेळोवेळी काढल्या जाणाऱ्या अॅन्युइटी रक्कमेवर व्यक्तीच्या टॅक्स ब्रॅकेटनुसार टॅक्स आकारला जातो.

NPS एक्झिटवरील टॅक्सबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहसा, रिटायरमेंट वेळी एखाद्या व्यक्तीकडे ग्रॅच्युइटी आणि इतर फायद्यांच्या माध्यमातून पैसे येतात. त्यामुळे हे पैसे कुठे गुंतवायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. NPS मध्ये गुंतवणुकीचे वय 60 वर्षांवरून 75 व्या वर्षापर्यंत वाढवल्यामुळे एखादी व्यक्ती NPS मध्ये ती रक्कम गुंतवू शकते. तसेच ती व्यक्ती ज्या कर ब्रॅकेटशी संबंधित आहे, त्यानुसार कराचा लाभ घेऊ शकते. टियर 2 काढण्यासाठी कोणतेही कर लाभ मिळत नाहीत.

प्रश्न 3. मी माझी जमा केलेली पेन्शन रक्कम अ‍ॅन्युइटायझेशन पूर्णपणे काढू शकते का?

NPS ही एक पेन्शन योजना आहे, ज्यात तुम्ही काम करत असताना गुंतवलेल्या पैशातून तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर पेन्शन मिळवता. सबस्क्रायबरला पुरेसं पेन्शन मिळावं याची खात्री करण्यासाठी, अ‍ॅन्युइटायझेशनशिवाय पेन्शनची संपूर्ण रक्कम काढता येत नाही. वर नमूद केल्याप्रमाणे, अ‍ॅन्युइटायझेशनसाठी किमान 40% पैसे वापरणे आवश्यक आहे. दरम्यान, एनपीएसमधून बाहेर पडताना जमा झालेली पेन्शन रक्कम 5 लाखांपर्यंत असल्यास ती ग्राहकाला काढता येते.

प्रश्न 4. जर एखादी व्यक्ती 60 वर्षे किंवा सेवानिवृत्तीनंतर एनपीएसमधून बाहेर पडली नाही तर काय होईल? रोखलेली रक्कम सेटल कधी होणार?

एनपीएस कॉर्पस काढण्यासाठी बाहेर पडण्याच्या रिक्वेस्टवर प्रोसेस होईपर्यंत एनपीएस अकाउंट चालू राहतं.

First published:

Tags: Open nps account