मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Credit Card Debt: क्रेडिट कार्डवरचं कर्ज खूप झालंय? ‘या’ सोप्या उपायांच्या मदतीनं होईल सुटका

Credit Card Debt: क्रेडिट कार्डवरचं कर्ज खूप झालंय? ‘या’ सोप्या उपायांच्या मदतीनं होईल सुटका

क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यास ग्राहकांना मोठा दंडही भरावा लागू शकतो. बहुतेक क्रेडिट कार्ड कंपन्या बिल न भरल्याबद्दल ग्राहकांकडून वार्षिक 40 टक्के दंड आकारतात. अशा परिस्थितीत ग्राहक या कर्जामध्ये अडकत राहतो.

क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यास ग्राहकांना मोठा दंडही भरावा लागू शकतो. बहुतेक क्रेडिट कार्ड कंपन्या बिल न भरल्याबद्दल ग्राहकांकडून वार्षिक 40 टक्के दंड आकारतात. अशा परिस्थितीत ग्राहक या कर्जामध्ये अडकत राहतो.

क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यास ग्राहकांना मोठा दंडही भरावा लागू शकतो. बहुतेक क्रेडिट कार्ड कंपन्या बिल न भरल्याबद्दल ग्राहकांकडून वार्षिक 40 टक्के दंड आकारतात. अशा परिस्थितीत ग्राहक या कर्जामध्ये अडकत राहतो.

नवी दिल्ली 29 एप्रिल : देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि डेबिट कार्ड वापराकडे (Debit Card) कल वाढत आहे. त्यात क्रेडिट कार्डचा वापर करण्याचं प्रमाण अलीकडे जास्त वाढलंय. बऱ्याचदा क्रेडिट कार्डच्या मदतीने लोक शॉपिंग करतात आणि मग ठराविक वेळेत ते कर्ज परत भरू शकत नाहीत. त्या कर्जामुळे टेन्शन तर असतंच, शिवाय क्रेडिट स्कोअर (Credit Card Score) खराब होतो. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना लोन मिळवण्यात अडचणी येतात.

नियमांनुसार, क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यास ग्राहकांना मोठा दंडही भरावा लागू शकतो. बहुतेक क्रेडिट कार्ड कंपन्या बिल न भरल्याबद्दल ग्राहकांकडून वार्षिक 40 टक्के दंड आकारतात. अशा परिस्थितीत ग्राहक या कर्जामध्ये अडकत राहतो. तुम्हीही क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या अशाच जाळ्यात अडकला असाल आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर आम्ही तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगणार आहोत.

UPI payment करताना फसवणुकीपासून सावध राहा, SBI ने दिल्या खास टिप्स

क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा

क्रेडिट कार्डवर भरपूर व्याज आकारलं जातं, त्यामुळे ते परवडत नाही; पण फार गरजेचं झाल्यानं ते ग्राहकाकडून घेतलं जातं. अशा परिस्थितीत जर वेळेवर ते भरता आलं नाही तर, बिल भरणं ग्राहकांसाठी खूप कठीण होऊ शकतं. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड बिल (Credit Car Bill) कमी व्याजदर असलेल्या कंपनीकडे ट्रान्सफर करू शकता. बऱ्याच वेळा अनेक कंपन्या जुन्या क्रेडिट कार्डचं बिल ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात. अशा परिस्थितीत तुम्ही जुन्या कंपनीकडे भरावं लागणारं अतिरिक्त व्याज टाळू शकता. परंतु, क्रेडिट कार्डचं बिल नवीन कंपनीकडे ट्रान्सफर करण्यापूर्वी त्यांचे चार्जेस आणि इतर फी योग्य पद्धतीने जाणून घ्या.

बिल EMI मध्ये रूपांतरित करा

जर तुमच्यावर क्रेडिट कार्डचं कर्ज असेल तर सर्वांत आधी तुम्ही तुमची एकूण रक्कम ईएमआयमध्ये (EMI) वाटून घ्या. तुम्हाला एकाचवेळी मोठी रक्कम जमा करताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशात तुम्ही तुमची एकूण रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित करा. यामुळे तुम्हाला ते देणं सोपं जाईल. बर्‍याच बँका मोठ्या क्रेडिट कार्डच्या रकमा लहान हप्त्यांमध्ये विभाजित करून देतात, त्यामुळे ग्राहकांना बिलं भरणं सोपे जातं. तसंच ईएमआयवरील व्याजही कमी आहे, म्हणून तुम्हाला ते भरण्यास अडचणी येणार नाहीत. या संदर्भात एबीपी लाईव्हने वृत्त दिलंय.

LIC च्या 'या' पॉलिसीत दररोज जमा करा 47 रुपये, एवढ्या वर्षात मिळतील 25 लाख

कमी व्याजदरात पर्सनल लोन घ्या

क्रेडिट कार्डच्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही पर्सनल लोनची (Personal Loan) निवड करू शकता. जास्तीचजास्त 11 टक्क्यांवर पर्सनल लोन मिळतं. तर क्रेडिट कार्डची बिलं न भरल्यास तुम्हाला त्यावर तब्बल 40 टक्क्यांनी व्याज भरावं लागेल. अशा परिस्थितीत सर्वप्रथम पर्सनल लोन घेऊन त्यातून क्रेडिट कार्डचं बिल भरणं हा उत्तम पर्याय ठरेल. त्यानंतर तुम्ही हळूहळू पर्सनल लोनची परतफेड करू शकता.

हे क्रेडिट कार्डच्या कर्जातून बाहेर पडण्याचे काही सोपे पर्याय आहेत. तुम्ही कर्ज वेळेवर फेडू शकला नाहीत, तर तुम्हाला हे पर्याय नक्कीच उपयोगी पडतील.

First published:

Tags: Credit card, Pay the loan