मराठी बातम्या /बातम्या /मनी /Business Idea: सरकारी मदतीने कमी गुंतवणुकीतून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल भरभक्कम कमाई

Business Idea: सरकारी मदतीने कमी गुंतवणुकीतून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल भरभक्कम कमाई

तुम्ही कटलरी उत्पादन युनिट (Cutlery Manufacturing Unit) सेट करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवलासाठी सरकारची मदतही मिळेल.

तुम्ही कटलरी उत्पादन युनिट (Cutlery Manufacturing Unit) सेट करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवलासाठी सरकारची मदतही मिळेल.

तुम्ही कटलरी उत्पादन युनिट (Cutlery Manufacturing Unit) सेट करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवलासाठी सरकारची मदतही मिळेल.

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वत:चा (Start Your Own Business) व्यवसाय सुरू केला आहे. तुम्ही देखील अशाप्रकारे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर बिझनेसची ही कल्पना वापरुन तुम्ही बंपर कमाई करू शकता. थोडे पैसे गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येतो आणि महिन्याभरात भरपूर कमाई करता येते.

तुम्ही कटलरी उत्पादन युनिट (Cutlery Manufacturing Unit) सेट करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवलासाठी सरकारची मदतही मिळेल. अर्थात भारत सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. कटलरी उत्पादन युनिट हा एक असा व्यवसाय आहे, ज्याची मागणी प्रत्येक घरात कायम आहे. याशिवाय पार्ट्या, लग्नसमारंभ, पिकनिक, खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये कटलरीला मागणी आहे. शिवाय हँडटूल आणि शेतीमध्ये वापरली जाणारी काही महत्त्वाची साधने देखील कटलरीपासून बनवता येतात. तसेच तुम्ही मोठ्या प्रमाणावर निर्यात करू शकता. यामध्ये घरगुती उत्पादनांव्यतिरिक्त तुम्ही इतर साधने देखील बनवू शकता.

हे वाचा-रियल इस्टेट शेअर्समध्ये वर्षभरात 40-100 टक्के वाढ, पुढे काय होणार?

या उद्योगात वर्षभर मागणी असल्याने तुम्ही या बिझनेस आयडियाचा विचार करू शकता. तुम्ही धातूपासून बनवलेल्या कटलरी मॅन्युफॅक्चरर्सचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे 1.14 लाख रुपये असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता. सेटअपसाठी तुम्हाला सुमारे 1.8 लाख रुपये खर्च करावा लागेल.

यासाठी तुम्हाला वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्राइंडर, हँड ड्रिलिंग, हँड ग्राइंडर, बेंच, पॅनेल बोर्ड आणि इतर साधनांची आवश्यकता असेल. याशिवाय तुम्हाला कच्च्या मालावर सुमारे 1.2 लाख रुपये खर्च करावे लागतील. अहवालानुसार, या कच्च्या मालातून दर महिन्याला 40,000 कटलरी, 20,000 हाताची साधने आणि 20,000 कृषी अवजारे तयार करता येतील.

किती होईल कमाई

सरकारच्या प्रकल्प अहवालानुसार, तयार उत्पादनाची दरमहा 1.10 लाख रुपयांची विक्री अपेक्षित आहे. त्याच्या निर्मितीसाठी दरमहा 91800 रुपये खर्च येईल. त्यानुसार, दरमहा तुम्हाला 18,000 रुपयांपेक्षा जास्त नफा होईल. कर्जाची परतफेड केल्यानंतर आणि इन्सेंटिव्ह वजा केल्यावर, तुमचा निव्वळ नफा 14,400 रुपयांपेक्षा जास्त असेल.

हे वाचा-Value Funds : वर्षभरात 5 स्कीम्सने दिलेत 44-64 टक्के रिटर्न्स, वाचा डिटेल्स

कर्जासाठी अर्ज कसा करावा

तुम्हाला कटलरी व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असल्यास, तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे, अशी सर्व माहिती द्यावी लागेल.

First published:
top videos

    Tags: Business, Business News