Home /News /money /

36 लाख रुपये कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्या फोनमध्ये करावं लागेल 'हे' काम

36 लाख रुपये कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्या फोनमध्ये करावं लागेल 'हे' काम

36 लाख रुपये कमवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जाणून घ्या.

    मुंबई, 06 जानेवारी: तुम्ही जर झटपट पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही 36 लाख रुपये जिंकू शकता. मात्र ते जिंकण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे पाहा. भारतात आर्थिक देवाण घेवाणीसाठी UPIचा वापर सर्वात मोठ्या प्रमाणावर केला जातो. मिळालेल्या अहवालानुसार महिन्याला UPI द्वारे 1 अरब ट्रान्झाक्शन होतात. ज्यामध्ये फीचर फोनद्वारे कमीत कमी 1 लाख ट्रान्झाक्शन होतात. अशावेळी UPI द्वारे पेमेंट करताना यूझर्सना अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे UPIच्या वापरावर त्याचा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. फीचर फोनद्वारे *99# डायल करून 5 लाख लोक आर्थिक व्यवहार करतात. त्यामुळे येणाऱ्या समस्यांचा विचार करून अधिक सोपी पद्धत आणण्याचा विचार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केला आहे. यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने NPCI सोबत एक करार केला आहे. हेही वाचा-सोन्याची चाळीशी पार, जाणून घ्या कधी होणार स्वस्त Grand Challenge Payments Using Feature Phones असं चॅलेंज जगभरातील नागरिकांसमोर बिल गेट्स यांनी ठेवलं आहे. यामध्ये जगभरातील स्टार्ट-अप किंवा कोणतीही व्यक्ती हे चॅलेंज स्वीकारू शकते. फीचर फोनमध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्याबाबत हे चॅलेंज असणार आहे. यासाठी एक खास पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलवरील माहितीनुसार हे चॅलेंज स्विकारणाऱ्या व्यक्तीला फीचर फोनमध्ये UPI द्वारे केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनमधील अडथळे दूर करायचे आहेत. UPI ट्रान्झाक्शन सुरळीत आणि अधिक सुरक्षित व्हावं यासाठी हे चलेंज देण्यात आलं आहे. हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला 36 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. कसं कराल अप्लाय तुम्हाला हे चॅलेंज फक्त 12 जानेवारीपर्यंत स्वीकारता येणार आहे. त्यामध्ये शॉर्टलिस्ट होणाऱ्या उमेदवारांना NPCI APIs चा एक्सेस देण्यात येईल. या उमेदवारांना टेक्निकल पॅरामीटर वापरून फीचर फोनमधील पेमेंट सिस्टममधील समस्या सोडवायच्या आहेत. विजयी उमेदवाराचं नाव 14 मार्च 2020 रोजी करण्यात येणार आहे. तीन विजयी उमेदवारांची नाव घोषित करण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकाला 50 हजार डॉलर जवळपास 35,84,275 रुपये दुसऱ्या क्रमांकाला 21,50,565 तर तिसऱ्या क्रमांकाला 14,33,710 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. हेही वाचा-Google Pay, Paytm वरून पेमेंट करताना काळजी घ्या, होऊ शकते फसवणूक
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Bill gates, Mobile phone

    पुढील बातम्या