मराठी बातम्या /बातम्या /मनी /

UIDAI Update: काय आहे मास्क्ड आधार? कसं कराल डाउनलोड, पाहा याचे फायदे

UIDAI Update: काय आहे मास्क्ड आधार? कसं कराल डाउनलोड, पाहा याचे फायदे

आधार कार्डला कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी, सुरक्षा देण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI मास्क आधारची सुविधा (Masked Aadhaar) देतं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 एप्रिल : आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारी सब्सिडी आणि सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य कागदपत्रांपैकी एक आहे. बँक खातं सुरू करण्यापासून ते अनेक खासगी कामांसाठीही हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड महत्त्वाचं असून त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे.

अनेकदा आधार कार्डधारकासोबत ऑनलाइन फ्रॉड, फसवणूक (Aadhaar Card Online Fraud) होते. त्यामुळे आधार कार्डला कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी, सुरक्षा देण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI मास्क आधारची सुविधा (Masked Aadhaar) देतं.

UIDAI कडूम दिल्या जाणाऱ्या या मास्क आधार कार्ड आयडीमध्ये कोणत्याही आधार कार्डचे शेवटचे 4 नंबर्स दिसतात. आधार कार्डवरील 8 आधार नंबर अशा रुपात‘XXXX-XXXX’ लिहिलेले असतात. अशाप्रकारे आधार कार्डवरील नंबर कोणीही पाहू शकत नाही. यामुळे आधारचा दुरुपयोग होण्यापासून बचाव होतो.

असं डाउनलोड करा मास्क्ड आधार कार्ड -

अधिकृत UIDAI च्या वेबसाइटवर लॉगइन करा आणि Download Aadhaar वर क्लिक करा.

आधार/व्हीआयडी/इनरोलमेंट आयडीचा पर्याय निवडा आणि मास्क्ड आधारवर क्लिक करा.

इथे मागितलेले सर्व डिटेल्स द्यावे लागतील. त्यानंतर Request OTP वर क्लिक करा.

तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.

ओटीपी टाका आणि Download Aadhaar वर क्लिक करा.

आता तुमचं मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड होईल.

हे वाचा - तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा

मास्क्ड आधार कार्ड पीडीएफ फॉर्मेटमध्येही उपलब्ध आहे. यासाठी पासवर्डचीही सुविधा असते. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर मास्क्ड आधार कार्डसाठीचा पासवर्ड पाठवला (Masked Aadhaar Card ID) जातो.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link