Home /News /money /

Insurance Policy : विमा संबंधित तक्रार कुठे आणि कशी कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Insurance Policy : विमा संबंधित तक्रार कुठे आणि कशी कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया

सध्या देशात विविध ठिकाणी 17 विमा लोकपाल कार्यरत आहेत. ग्राहक स्वत: किंवा त्याच्या कायदेशीर सोर्समार्फत किंवा नामनिर्देशित व्यक्तीमार्फत त्यांच्या क्षेत्रातील विमा लोकपालाकडे लेखी तक्रार करू शकतो.

    मुंबई, 25 जानेवारी : कोरोनानंतर आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींमध्ये (Life Insurance Policy) बरीच वाढ झाली आहे. मात्र नवीन विमाधारकांना कोणताही त्रास झाल्यास तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न भेडसावत आहे. बँकांप्रमाणेच विमा कंपनीशी संबंधित तक्रारींसाठी ग्राहकांना विमा लोकपालचा (Insurance Lokpal) पर्याय उपलब्ध आहे. ग्राहकांनी प्रथम त्यांची तक्रार विमा कंपनीकडे करावी. ग्राहक तक्रारीसह विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे (GRO) संपर्क साधू शकतात. ग्राहक विमा कंपनीच्या जवळच्या शाखेलाही भेट देऊ शकतो किंवा GRO ला मेल करू शकतो. ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी IGMS, IRDA चे ऑनलाइन पोर्टल देखील वापरू शकतात. विमा कंपनीने 15 दिवसांच्या आत तुमची समस्या सोडवावी. जर 15 दिवसांनंतरही तुमची समस्या सोडवली गेली नाही किंवा तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही ही समस्या पुढील स्तरावर नेऊ शकता. तुम्ही तुमच्या तक्रारीसह विमा नियामक IRDA कडे संपर्क साधू शकता. जर तुम्ही विमा कंपनीच्या सोल्यशन आणि IRDA च्या निर्णयावर समाधानी नसाल तर तुम्ही तुमची तक्रार विमा लोकपालाकडे करू शकता. Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी 17 विमा लोकपाल सध्या देशात विविध ठिकाणी 17 विमा लोकपाल कार्यरत आहेत. ग्राहक स्वत: किंवा त्याच्या कायदेशीर सोर्समार्फत किंवा नामनिर्देशित व्यक्तीमार्फत त्यांच्या क्षेत्रातील विमा लोकपालाकडे लेखी तक्रार करू शकतो. म्हणजेच, ग्राहक आता जिथे राहतो, तो त्याच भागातील विमा लोकपालाकडे तक्रार करू शकतो. क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण, वाचा सविस्तर विमा लोकपालकडे तक्रार कशी करावी? >> एक महिन्यानंतरही तुम्हाला तुमच्या तक्रारीसाठी विमा कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही किंवा तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या प्रतिसादाने समाधानी नसाल तर तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार दाखल करू शकता. >> तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील विमा लोकपाल कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. >> विमा लोकपालला पत्र पाठवून किंवा ई-मेल करून तक्रार दाखल केली जाऊ शकते. तुम्ही तुमची तक्रार ई-मेल करत असल्यास, तुम्हाला त्याची हार्ड कॉपी नंतर लोकपाल कार्यालयात पाठवावी लागेल. >> तुमच्या पत्रामध्ये पॉलिसी क्रमांक आणि तक्रारीचे तपशील यासारखी सर्व आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला संबंधित कागदपत्रे लोकपाल कार्यालयात पाठवावी लागतील. >> जर तुम्ही लोकपाल कार्यालयात जात असाल तर तुम्हाला फॉर्म P-II आणि फॉर्म P-III भरावा लागेल. तुम्ही तुमची कागदपत्रे पोस्टाने पाठवली असल्यास, विमा लोकपाल तुम्हाला हे फॉर्म भरण्यास सांगेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Health, Insurance

    पुढील बातम्या