Home /News /money /

बँकेत एकापेक्षा जास्त अकाऊंट असतील तर येऊ शकतात अडचणी, असं करा बंद

बँकेत एकापेक्षा जास्त अकाऊंट असतील तर येऊ शकतात अडचणी, असं करा बंद

आर्थिक मार्गदर्शक सूचनांनुसार गरजेपेक्षा जास्त बचत खाती असतील, तर अशी खाती बंद करण्याचा सल्ला दिला जातो. जर अनावश्यक बँक सेव्हिंग अकाउंट असतील, तर ती बंद करता येतात.

  नवी दिल्ली, 6 डिसेंबर : बँक (Bank) खात्यावर अनेक प्रकारचे चार्ज वसूल केले जातात. जर एकाहून अधिक बँक सेव्हिंग अकाउंट (Savings Account) असतील, तर त्यावरील चार्ज द्यावे लागतील. आर्थिक मार्गदर्शक सूचनांनुसार गरजेपेक्षा जास्त बचत खाती असतील, तर अशी खाती बंद करण्याचा सल्ला दिला जातो. जर अनावश्यक बँक सेव्हिंग अकाउंट असतील, तर ती बंद करता येतात. यासाठी काही प्रोसेस कराव्या लागतात. बँक सेव्हिंग अकाउंट बंद करताना, डी-लिंकिंगचा अकाउंट फॉर्म भरावा लागतो. अनावश्यक असलेले सेव्हिंग अकाउंट बंद करण्यापूर्वी त्या खात्यातील सर्व पैसे काढून घ्या. हे काम एटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्सफरनेही करू शकता. बँक क्लोजर फॉर्म - सेव्हिंग बँक अकाउंट बंद करण्यासाठी स्वत: ब्रांचमध्ये जाऊन क्लोजर फॉर्म भरावा लागतो. त्यावेळी सेव्हिंग अकाउंट का बंद करायाचं आहे, हेदेखील सांगावं लागेल. जर खात्यात पैसे असतील आणि ते दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे असतील तर, आणखी एक फॉर्म भरावा लागेल.

  (वाचा - सावधान! Amazon, Apple च्या नावाने ऑनलाईन फसवणूक; कसा कराल यापासून बचाव)

  चेकबुक, पासबुक आणि डेबिट कार्ड - सेव्हिंग अकाउंट बंद करताना वापरले नसलेले चेकबुक, पासबुक आणि डेबिट कार्ड घेऊन जावे लागतील. क्लोजर फॉर्म भरताना बँक या गोष्टी जमा करण्यासाठी सांगू शकते.

  (वाचा - अलीकडेच कमाईची सुरुवात केली आहे का? वाचा बचत आणि गुंतवणुकीसाठी BEST TIPS)

  क्लोजिंग चार्ज - एखाद्या बँकेत सेव्हिंग अकाउंट ओपन केल्यानंतर, केवळ 14 दिवसांच्या आतच बंद करायचं असल्यास बँक सामान्यपणे कोणताही चार्ज घेत नाही. 14 दिवस ते 1 वर्ष या काळात अकाउंट बंद करायचं असल्यास, क्लोजर चार्ज द्वावा लागू शकतो. एक वर्षाहून अधिक जुनं बँक सेव्हिंग अकाउंट बंद करण्यासाठी बँक सामान्यपणे कोणताही चार्ज घेत नाही.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या