जुनं बँक अकाउंट बंद करताय? मग ही काळजी घ्यायलाच हवी

जुनं बँक अकाउंट बंद करताय? मग ही काळजी घ्यायलाच हवी

Bank, Account - तुम्हाला तुमचं बँकेचं खातं बंद करायचं असेल तर या गोष्टी करायला लागतील

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : तुम्हाला जुनं अकाउंट बंद करायचंय का? मग काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. हल्ली नोकरीच्या निमित्तानं अनेक जण दुसऱ्या शहरांमध्ये शिफ्ट होतात. तेव्हा त्यांना बँक अकाउंट बदलावं लागतं. ग्राहकांचा झीरो बॅलन्स अकाउंट असेल आणि काही महिने त्यात पगार पडला नाही तर त्या अकाउंटचं रूपांतर बचत खात्यात होतं. पण अनेकदा त्या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी लागतेच. ते शक्य होत नसेल तर तुम्ही ते अकाउंट बंद केलेलंच बरं. तेव्हा याची काळजी घ्या -

1. सर्व अॅटोमॅटिक डेबिट्स बंद करा - तुमच्या अकाउंटला लिंक असलेल्या सर्व डेबिट लिंक्स बंद करून घ्या. अनेकदा EMI, फोन बिल, वीज बिल डेबिट होतं. नवा अकाउंट नंबर आपल्या कर्जदात्यांना द्या.

SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आता झीरो बॅलन्स अकाउंटचे मिळतील 'हे' फायदे

2. नवे अकाउंट डिटेल्स अपडेट करा - तुम्ही जुनं सॅलरी अकाउंट बंद करणार असाल तर तुमच्या एम्पलाॅयरला नवे अकाउंट डिटेल्स द्या. ज्या अकाउंटला तुम्ही बंद करणार असाल त्यात निवृत्तीनंतर पेंशन पडणार असेल तर सरकारी एम्प्लाॅयरला ती माहिती द्या.

'या' व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई

3. बँकेच्या शाखेत भेट द्या - तुम्हाला तुमचं खातं बंद करायचं असेल तर बँकेच्या ब्रँचमध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला अकाउंट क्लोजर फाॅर्म भरावा लागेल. या फाॅर्मबरोबर डी-लिंकिंग फाॅर्मही सबमिट करावा लागेल. तुमच्याकडे असलेलं चेक बुक, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जमा करावं लागेल.

हाय कोर्टात नोकरीची मोठी संधी, 'या' उमेदवारांना आहे पसंती

4. अकाउंट बंद करायचं शुल्क - तुम्ही बचत खातं उघडल्यानंतर 14 दिवसाआधी बंद केलं तर त्याला काही पैसे पडत नाहीत. पण त्यानंतर एक वर्षाच्या आधी बंद केलं तर त्याला पैसे पडतात. पण वर्षानं अकाउंट बंद केलं तर कुठलंच शुल्क पडत नाही. देशातली सर्वात मोठी सरकारी बँक खातं बंद करायला 500 रुपये घेते.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार? पाहा SPECIAL REPORT

Published by: Sonali Deshpande
First published: September 20, 2019, 4:50 PM IST
Tags: bank

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading