मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पगारातून दरमाह PF चे पैसे कापले जातात, मात्र खात्यात किती रक्कम जमा झाली? घसबसल्या सोप्या पद्धतीने तपासा

पगारातून दरमाह PF चे पैसे कापले जातात, मात्र खात्यात किती रक्कम जमा झाली? घसबसल्या सोप्या पद्धतीने तपासा

How to check PF Balance : तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही घरी बसून एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

How to check PF Balance : तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही घरी बसून एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

How to check PF Balance : तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही घरी बसून एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 5 मे : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे मॅनेज केलेली सेवानिवृत्ती योजना आहे. ईपीएफ खात्यात, कर्मचारी आणि त्यांची कंपनी प्रत्येक महिन्याला समान रक्कम योगदान देतात, जी मूळ वेतनाच्या 12 टक्के असते. कंपनीचे 8.33 टक्के योगदान कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जाते. EPFO दरवर्षी पीएफ व्याजदर जाहीर करते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही घरी बसून एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

Missed Call देऊन चेक करा बॅलेन्स

यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता.

SMS द्वारे जाणून घ्या बॅलेन्स

SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे गरजेचं आहे.

Umang App च्या वर चेक करा

तुमचे उमंग App उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) एंटर करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलेन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता.

वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक

यासाठी तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.

First published:

Tags: Epfo news, Money, PF Amount