मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Aadhaar Cardच्या माध्यमातून बँक खात्यातील शिल्लक कशी तपासायची? समजून घ्या प्रक्रिया

Aadhaar Cardच्या माध्यमातून बँक खात्यातील शिल्लक कशी तपासायची? समजून घ्या प्रक्रिया

आधार कार्ड 10 वर्षं जुनं असेल तर येऊ शकतात अडचणी; ही प्रोसेस वापरून करा अपडेट

आधार कार्ड 10 वर्षं जुनं असेल तर येऊ शकतात अडचणी; ही प्रोसेस वापरून करा अपडेट

Check Bank balance using Aadhaar Card: आधार कार्ड बँक खात्यासोबतच पॅन कार्डशी जोडलं जात आहे. 12 अंकी आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही एटीएम काउंटर किंवा बँकेच्या शाखेत न जाता तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 4 सप्टेंबर: आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक प्रमुख दस्तऐवज आहे, जे अलीकडच्या काळात अनेक कारणांसाठी वापरलं जातं. आधार कार्डचा वापर केवळ ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी केला जात नाही, तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही केला जातो. त्याचबरोबर बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.

आधार कार्ड बँक खात्यासोबतच पॅन कार्डशी जोडलं जात आहे. तथापि, 12 अंकी आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही एटीएम काउंटर किंवा बँकेच्या शाखेत न जाता तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता. जे स्मार्टफोन वापरत नाहीत किंवा घरी बसून आधारवरून बॅलन्स तपासू इच्छितात (Check Bank balance using Aadhaar Card) त्यांना या सुविधेचा फायदा होईल.

जर तुम्हाला आधार कार्डनं बँक बॅलन्स तपासायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. तुम्ही आधारवरून बँक बॅलन्स कसा तपासू शकता. यासाठी तुमच्याकडं आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे.

आधार कार्डच्या माध्यमातून बँक खात्यातील शिल्लक कशी तपासायची?

  • सर्वप्रथम बँक खात्यात नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवरून 9999*1# डायल करा.
  • आता 12 अंकी आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक पुन्हा टाकून पडताळणी करा.
  • तुम्हाला UIDAI कडून स्क्रीनवर बँक बॅलन्ससह एक फ्लॅश एसएमएस पाठवला जाईल.

हेही वाचा: Investment Tips: आर्थिक स्थैर्यासाठी टाळा अनावश्यक खर्च, या टिप्स तुम्हाला मदत करतील

तुम्ही 'या' सुविधांचाही लाभ घेऊ शकता-

12 अंकी आधार क्रमांक वापरून तुम्ही फक्त बँक बॅलन्स तपासू शकत नाही, तर वापरकर्ते इतर गोष्टीही करू शकतात. आधारच्या मदतीनं तुम्ही पैसे पाठवू शकता, सरकारी अनुदानासाठी अर्ज करू शकता किंवा आधार कार्डच्या मदतीनं पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता आणि आधार केंद्राला भेट देऊन आधारमधून पैसे काढू शकता.UIDAI नं अलीकडेच म्हटलं आहे की, तुमचा फोन नंबर आधारशी लिंक करणं, इतर तपशील अद्ययावत करणं इत्यादी घरोघरी सेवा पुरवण्याची योजना आखत आहे. या सेवेमुळे लोकांना आधार सेवेकडे जाण्याची गरज भासणार नाही. या सेवांचा लाभ घेण्यासाठी UIDAI सध्या 48,000 इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टमनना प्रशिक्षण देत आहे. यानंतर पोस्टमनच्या माध्यमातून आधार सेवा तुमच्या घरापर्यंत पोहोचवली जाईल.

First published:

Tags: Aadhar card, Bank services