मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले माहिती नाही? घरबसल्या सोप्या पद्धतीने बॅलेन्स तपासा

तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले माहिती नाही? घरबसल्या सोप्या पद्धतीने बॅलेन्स तपासा

PF Balance : मेसेजद्वारे तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 5 मे : नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या पगारातून एक ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होते. दर महिन्याला कर्मचारी आणि कंपनी प्रत्येक महिन्याला समान रक्कम योगदान देतात. मात्र तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होतेय हे तुम्हाला माहिती हवं. त्यासाठी तुम्ही घरी बसून एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे तुमचा पीएफ बॅलेन्स तपासू शकता. मिस्ड कॉलद्वारे बॅलेन्स चेक करता येईल यूएएन पोर्टलवर रजिस्टर मेंबर्सना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील बॅलेन्स तपासता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. PM Kisan योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका, शिक्षेसह आर्थिक फटका बसू शकतो मेसेजद्वारे बॅलेन्स तपासा मेसेजद्वारे तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे गरजेचं आहे. Umang App च्या वर चेक करा तुमचे उमंग App उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विसवर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड एंटर करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलेन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता. Online Tax Filing App: ऑनलाइन रिटर्न भरताना होणारा त्रास संपणार, टाटाच्या ‘या’ अ‍ॅपमध्ये आहेत उत्तम सुविधा वेबसाइटवर तपासा बॅलेन्स Epfindia.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.
First published:

Tags: Epfo news, Money, PF Amount

पुढील बातम्या