मराठी बातम्या /बातम्या /मनी /Budget 2023: बजेटचे डॉक्यूमेंट ऑनलाइन पाहायचेय? ही आहे प्रोसेस

Budget 2023: बजेटचे डॉक्यूमेंट ऑनलाइन पाहायचेय? ही आहे प्रोसेस

Budget 2023

Budget 2023

आगामी अर्थसंकल्प मागील दोन वेळेप्रमाणे पेपरलेस पद्धतीने सादर केला जाणार आहे. मंत्र्यांच्या भाषणानंतर, त्यांनी केलेल्या सर्व घोषणा अ‍ॅपवर अपलोड केल्या जातील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जानेवारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेटच्या सादरीकरणाचे लाइव्ह स्ट्रिमिंग सकाळी 11 वाजता सुरू होईल. तुम्ही ते लोकसभा टीव्हीवर पाहू शकता. राज्यसभा टीव्ही आणि दूरदर्शनसह इतर प्रायव्हेट चॅनल्सवरही सीतारामण यांचे भाषण सुरु राहील. मात्र आणखी एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता. विशेषत: जर तुमचे अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकने राहिले असेल. तर 'Union Budget Mobile App' द्वारे तुम्ही ते वाचू शकता.

केंद्रीय बजेट मोबाइल अ‍ॅप

आगामी अर्थसंकल्प मागील दोन वेळेप्रमाणे पेपरलेस पद्धतीने सादर केला जाणार आहे. मंत्र्यांच्या भाषणानंतर, त्यांनी केलेल्या सर्व घोषणा अ‍ॅपवर अपलोड केल्या जातील. जिथे माहितीचे विविध विभागांतर्गत वर्गीकरण केले गेले आहे, ज्यामुळे आवश्यक तपशीलांमध्ये प्रवेश करणे सोपे होईल. खरं तर, सर्व बजेट दस्तऐवज - एकूण चौदा - अ‍ॅपवर उपलब्ध केले जातात.

'या' 5 जणांवर आहे बजेटची जबाबदारी, निर्मला सीतारामण यांचे 5 चाणक्य कोण? 

इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये माहिती उपलब्ध

अ‍ॅप Google Play Store आणि Apple App Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते. लोक त्याला Indiabudget.gov.in पोर्टलवरून देखील अ‍ॅक्सेस करू शकतात. बजेट 2023 कागदपत्र ऑनलाइन तपासण्यासाठी:

-https://www.indiabudget.gov.in/ वर जावे.

-‘Budget Speeches’ वर क्लिक करा.

-2023-24 चे पीडीएफ डॉक्यूमेंट शोधा.

देशाचं पहिलं बजेट कोणी सादर केलं? तुम्हाला या Interesting Facts माहिती आहेत का? 

येथे पाहू शकता बजेट?

बजेट तुम्हाला ऑनलाइन पाहायचे असल्यास तुम्ही पीआयबी आणि संसद टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलचा वापर करु शकता. दूरदर्शन आणि संसद टीव्हीवर देखील तुम्ही ते लाईव्ह पाहू शकता. यासोबतच News Lokmat चॅनलवर देखील तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील.

First published:

Tags: Budget 2023, Union budget