मुंबई, 22 जानेवारी: कार खरेदी करणं आता प्रत्येकाची गरज बनली आहे. कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक कर्ज काढतात आणि हेच कर्ज फेडणं कधी-कधी कठीण होतं. कार खरेदी करताना नियोजन करणं गरजेचं आहे. कार खरेदी करताना जर तुम्ही नियोजन कराल तर कर्ज काढण्याची गरज भासणार नाही.
1.कार खरेदी करणं आता प्रत्येकाची गरज झाली आहे. कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक कर्ज काढतात आणि हेच कर्ज फेडणं अधिक कठीण होत जातं.
2.कार खरेदी करताना नियोजन करणं गरजेचं असतं. गरज आणि त्यानुसार किती मोठी आणि कशी कार घ्यायची हे ठरवलं की खर्चाचं आणि बचतीचं गणित मांडता येतं.
3.तुमच्याकडे एक उत्तम पर्याय आहे. तीन वर्षांपर्यं म्य़ुच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक जरी तुम्ही केलीत तरी त्यावर मिळणारा फायदा हा शेअर बाजारावर अवलंबून असेल. त्यामुळे कोणते फंड आणि कसे निवडायचे यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
4.तीन वर्षाच जेवढे पैसे जमा होतील त्यातून कर्जाशिवाय 5 लाखांपर्यंत तुम्ही कार खरेदी करू शकता.
5.5 लाखांपर्यंत कार खरेदी करायची असेल तर 5 वर्षांसाठी दर महिन्याला 6500 रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी लागेल.
6.यावर तुम्हाला 8 ते 10 टक्के रिटर्न मिळालं तर 5 वर्षांत 5 लाख रुपये जमा होतात. यामध्ये 3 लाख 90 हजार तुमची गुंतवणूक असते आणि 1 लाख 10 हजार यावर तुमचा फायदा होतो. अर्थात हे सर्व त्यावेळच्या शेअर बाजारातील घडामोडींवरही अवलंबून आहे. काहीवेळा जास्त फायदाही होऊ शकतो.
7.कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला लॉर्जकॅप, बॅलेंस्ट किंवा इक्विटी सेविंगमध्ये गुंतवणूक करावी लागेल.
8.गुंतवणुकीत अधिक मोठा धोका नको असेल तर इक्विटी सेविंग हा पर्याय जास्त चांगला आहे.
9.म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून नीज नियोजन केलं तर तुम्हाला 3 लाख 90 हजार रुपये साधारण लागतील आणि 5 लाखांपर्यंत कार खरेदी करता येऊ शकते. तुम्ही थेट कर्ज काढून कार घेत असला त्याचं गणित केलंत तर लक्षात येईल की तुम्हाला कार अधिक खर्चात पडेल.
10. 5 लाखांची कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1 लाखाचं डाऊन पेमेंट करून तुम्हाला 4 लाखाचं कर्ज काढावं लागले त्यावर 8.40 ते 9.25 टक्के व्याज लागले. साधारण साडे आठ ते 9 हजारांपर्यंत तुमचा हप्ता जाईल.