मुंबई, 20 मार्च : कोणाला श्रीमंत व्हावे वाटत नसेल? आपल्या खात्यात कोट्यवधी रुपये असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या काळात शिस्तबद्ध पद्धतीने बजेट तयार करून, थोडी बचत करून आणि हुशारीने गुंतवणूक करून दर महिन्याला तुम्ही हे उद्दिष्ट साध्य करू शकता. तुम्हालाही लवकरात लवकर कोट्यधीश व्हायचे असेल तर ही वेळ अगदी योग्य आहे. याचे कारण नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष नव्याने आर्थिक नियोजन करण्यासाठी योग्य वेळ आहे.
फक्त 20 रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही कोट्यधीश होऊ शकता
महागाईच्या या युगात मोठी बचत करणे थोडे कठीण आहे. परंतु दररोज 20 रुपयांची बचत करणे फार कठीण काम नाही आणि शिस्तबद्ध बचत आणि दररोज 20 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. ते कसे शक्य आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करून उद्दिष्टे साध्य करता येतात
म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करून कोट्यधीश होण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकता. याचे कारण म्हणजे म्युच्युअल फंडांनी गेल्या 25 वर्षांत खूप चांगला परतावा दिला आहे. काही फंडांनी दीर्घ मुदतीत 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही त्यात दर महिन्याला गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात दर महिन्याला गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैशांची गरज नसते. तुम्ही म्युच्युअल फंडात फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
घाऊक डिझेलच्या दरात लिटरमागे 25 रुपयांची वाढ! महाराष्ट्रातील दर जाणून घ्या
कोट्यधीश होण्याचे हे आहे सूत्र (How to become Crorepati)
समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 व्या वर्षापासून दररोज 20 रुपये वाचवायला सुरुवात केली, तर त्याची एका महिन्यात 600 रुपये वाचतील. जर त्याने म्युच्युअल फंडात दरमहा 600 रुपये गुंतवले तर ती व्यक्ती कोट्यधीश होऊ शकते. यासाठी व्यक्तीला 40 वर्षे (480 महिने) दरमहा 600 रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे, त्याला फक्त 2.88 लाख रुपये गुंतवावे लागतील. जर त्याला या गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 15 टक्के व्याज मिळत असेल, तर तो केवळ 2.88 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 40 वर्षांत 1.86 कोटी रुपये उभे करू शकतो.
आता विना Ration Card घेता येणार धान्य, संसदेत सरकारची मोठी घोषणा
दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा फायदा
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळविण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरते. याचे कारण या काळात चक्रवाढीचा लाभ मिळतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20 वर्षांसाठी दरमहा 600 रुपये गुंतवले आणि वार्षिक सरासरी दर 15 टक्के इतकाच राहिला तर तुम्हाला 20 वर्षांनंतर फक्त 18.66 लाख रुपये मिळतील. या दरम्यान तुमची एकूण गुंतवणूक 1.44 लाख रुपये असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.