• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Fraud Alert : मोबाईलवर आलेला एक मेसेज खाली करु शकतो बँक अकाऊंट, काय खबरदारी घ्याल?

Fraud Alert : मोबाईलवर आलेला एक मेसेज खाली करु शकतो बँक अकाऊंट, काय खबरदारी घ्याल?

मोबाईलवर गिफ्ट व्हाऊचरची लिंक पाठवून तुम्हाला तुमची एटीएम-डेबिट कार्ड माहिती (ATM/Debit Card Details) विचारली जात असल्यास, सावधगिरी बाळगा. तसेच पेमेंट दरम्यान जर कोणी तुम्हाला OTP विचारला तर समजा की तुम्ही हॅकर्सचे टार्गेट आहात.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर : कोरोनाचं संकट (Corona Crises) अद्यापही पूर्णत: संपुष्टात आलेलं नाही. त्यामुळे दिवाळी सण (Diwali Festival) असला तरी लोक गर्दीच्या ठिकाणी खरेदीला जाण्याऐवजी सोपा आणि सुरक्षित ऑनलाईन शॉपिंगचा (Online Shopping) मार्ग स्वीकारत आहेत. मात्र ऑनलाईन शॉपिंग करतेवेळी काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण हॅकर्स आणि ऑनलाईन फसवणूक  (Online Fraud) करणारे गुन्हेगार लोकांचे आर्थिक नुकसान करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. सायबर गुन्हेगार दिवाळी गिफ्ट, गिफ्ट व्हाउचर, मोठ्या डिस्काउंटवर खरेदी किंवा लॉटरी असे मेसेज पाठवतात. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्यावर काळजीपूर्वक क्लिक करा. कारण एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होऊ शकते. फसवणुकीचे मेसेज कसे ओळखायचे? मोबाईलवर गिफ्ट व्हाऊचरची लिंक पाठवून तुम्हाला तुमची एटीएम-डेबिट कार्ड माहिती (ATM/Debit Card Details) विचारली जात असल्यास, सावधगिरी बाळगा. तसेच पेमेंट दरम्यान जर कोणी तुम्हाला OTP विचारला तर समजा की तुम्ही हॅकर्सचे टार्गेट आहात. तसं पाहिलं तर कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था पेमेंट करताना ग्राहकांकडून ओटीपी मागत नाही. जर एखादी अनोळखी व्यक्ती किंवा लिंक नवीन अॅप डाउनलोड करण्यास सांगत असेल तर समजून घ्या की तुम्ही हॅकिंगचे शिकार होऊ शकता. पेन्शनधारकांसाठी खुशखबर, जीवन प्रमाणपत्र घरबसल्या जमा करा! कसं? वाचा सविस्तर फसवणूक कशी केली जाते? ऑनलाइन फसवणूक करणारे गुन्हेगार प्रथम लॉटरी सोडतीची लिंक किंवा वस्तूंवर मोठी सवलत असे मेसेज व्हॉट्सअॅप किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवतात. त्यात दिलेली माहिती वाचण्यासाठी बहुतेक लोक लिंकवर क्लिक करतात. तुम्ही लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या Google Pay किंवा PhonePe द्वारे काही पैसे कापले जातात. तुम्ही चुकून ओटीपी दिल्यास त्यांना तुमच्या बँक खात्याचा पूर्ण अॅक्सेस मिळतो. Post Office Scheme:दरमाह जमा करा 1500 रुपये, मिळवा 35 लाख; वाचा स्कीमबद्दल सर्वकाही काय खबरदारी घ्यावी? >> कमी पैसे खात्यातून काढले गेले म्हणून अकाऊंट फक्त ब्लॉक करून दुर्लक्ष करू नका. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार नोंदवा. >> तुमच्या PhonePe, Google Pay किंवा इतर UPI मध्ये OTP केल्यानंतर पेमेंटची सेटिंग करा. कोणी OTP मागितला तर तो देऊ नका. >> जर एखाद्या अज्ञात व्यक्तीने तुमच्या खात्याची माहिती मागितली तर ती देऊ नका. कोणतीही बँक खाते किंवा एटीएम-डेबिट कार्ड तपशील विचारत नाही. >> जर तुम्हाला कोणत्याही लिंकमध्ये अनोळखी अॅप डाऊनलोड करून पेमेंट करण्यास सांगितले जात असेल तर ते अजिबात करू नका. >> कोणाच्या सांगण्यावरून Any Desk, Team Viewer किंवा इतर कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. याच्या मदतीने हॅकर्सना तुमच्या सिस्टीम किंवा मोबाईलमध्ये प्रवेश मिळेल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: