Home /News /money /

Alert: घरबसल्या लोन मिळतंय, म्हणून डोळे झाकून प्रोसेस करु नका; फसवणूक होऊ नये यासाठी अशी घ्या काळजी

Alert: घरबसल्या लोन मिळतंय, म्हणून डोळे झाकून प्रोसेस करु नका; फसवणूक होऊ नये यासाठी अशी घ्या काळजी

'सेल्फीच्या फोटोवरून अश्लील आणि नग्न फोटो तयार करून पैसे द्या नाहीतर हे फोटो तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना आणि संपर्कातील सर्व लोकांना पाठवू'

'सेल्फीच्या फोटोवरून अश्लील आणि नग्न फोटो तयार करून पैसे द्या नाहीतर हे फोटो तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना आणि संपर्कातील सर्व लोकांना पाठवू'

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ऑनलाईन लोन घेताना काय काळजी घ्याल.

    मुंबई, 9 एप्रिल : डिजिटल युगात, बँकेच्या सर्व कामं काही वेळात घरबसल्या होत आहेत. कार, घर, उच्च शिक्षण, व्यवसाय किंवा वैयक्तिक कर्ज यांसारखे कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. ऑनलाईन कुठेही बसून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता करू शकता. झी बिझनेसने याबाबत वृत्त दिलं आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अॅक्सिस बँकेने अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या तुम्हाला ऑनलाइन कर्जासाठी अर्ज करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. पब्लिक Wifi किंवा संगणक वापरू नका सायबर कॅफे, ई-लायब्ररी इत्यादी पब्लिक कॉम्युटर्समध्ये ऑनलाइन बँकिंग करून तुम्ही सहजपणे सायबर गुन्ह्यांचे बळी होऊ शकता. तुमच्या पब्लिक कॉम्प्युटरवर 'Auto Complete' फंक्शन चालू असल्यास, तुमचा ईमेल आयडी आणि इतर आर्थिक डेटा चोरणे खूप सोपे आहे. म्हणून, पब्लिक सिस्टमचा वापर अगदी आवश्यक असेल तेव्हाच करा. पब्लिक कॉम्प्युटरचा वापर केल्यानंतर ब्राउझिंग हिस्ट्री, कॅशे आणि टेंप फाइल्स हटवा. तसेच, व्यवहार पूर्ण केल्यानंतर सिस्टममधून नेहमी लॉग आउट करा आणि तुमचा लॅपटॉप, डेस्कटॉप आणि टॅबलेट कधीही दुर्लक्षित ठेवू नका. SBI ने ग्राहकांना केलं सावध; ऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी दिल्या खास टिप्स फक्त अधिकृत आणि सुरक्षित पोर्टल वापरा तुमच्या बँकेशी जोडलेल्या अनेक बनावट वेबसाइट्स देखील असू शकतात. अगदी ओरिजनल सारखी दिसणारी ही साइट तुमचे खूप मोठे नुकसान करू शकते. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग करताना तुम्ही बँकेचे ओरिजनल आणि अधिकृत पोर्टल वापरत असल्याची खात्री करा. अधिक सुरक्षित होण्यासाठी, अॅड्रेस बारमध्ये बँकेची अधिकृत URL एंटर करा. तुमच्या ईमेल आयडीवर किंवा मेसेज स्वरूपात आढळलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा. यामुळेही तुमचं नुकसान होऊ शकतं. ईमेलमध्ये सापडलेली फेक लिंक जेव्हा फिशिंग आणि टेक्स्टच्या स्वरूपात आढळते तेव्हा त्याला स्मिशिंग म्हणतात. कागदपत्रे अपलोड करताना काळजी घ्या कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे जसे की पॅन, आधार, बँक तपशील इत्यादी अपलोड करण्याची आवश्यकता असू शकते. या कागदपत्रांमध्ये महत्त्वाची आर्थिक माहिती असते. जर तुम्ही ही कागदपत्रे बँकेच्या अधिकृत वेबसाइटऐवजी इतरत्र अपलोड केली तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये लोकांचा कल वाढला; वर्षभरात वाढले एक कोटी ग्राहक, तुम्हीही केली का गुंतवणूक? बनावट प्रमोशनल कॉलपासून सावध रहा व्हॉईस रेकॉर्ड केलेले कॉल किंवा टेलीमार्केटरकडून कर्ज देणारे कॉल्स हे आजकाल खूप सामान्य आहेत. यापैकी काही खरे असू शकतात परंतु काही तुमचा डेटा चोरण्यासाठी बनावट कॉल आहेत. त्यामुळे अशा कॉलमध्ये तुमची वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बँकेत नोंदवा तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बँकेत नोंदवून तुम्ही तुमच्या आर्थिक व्यवहारांबद्दल नियमित अपडेट मिळवू शकता. हे तुम्हाला तुमच्या कर्ज अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यास आणि इतर अपडेटचा पाठपुरावा करण्यात मदत करेल. काही विसंगती आढळल्यास, तुम्ही ताबडतोब बँकेला फसवणुकीची तक्रार करू शकता. एक मजबूत पासवर्ड आणि पिन वापरा ऑनलाइन बँकिंग वापरताना नेहमी मजबूत पिन आणि पासवर्ड वापरा. साधे आणि अतिवापरलेले पासवर्ड आणि पिन टाळा. यासोबतच वेळोवेळी बदलत राहा.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Financial fraud, Loan, Online crime

    पुढील बातम्या