मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI Kisan Credit Card: एसबीआय किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना पिककर्ज, सोप्या पद्धतीने करा अर्ज

SBI Kisan Credit Card: एसबीआय किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना पिककर्ज, सोप्या पद्धतीने करा अर्ज

मुंबई, 28 ऑक्टोबर : एसबीआयचे (State Bank Of India) किसान क्रेडिट कार्ड (SBI Kisan Credit Card) शेतकऱ्यांना पिक लागवडीचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे आणि वेळेवर कर्ज उपलब्ध करत आहे. त्याशिवाय बँकेतर्फे शेतकऱ्यांना आकस्मिक खर्चासाठी आणि पूरक उपक्रमांच्या खर्चाची काळजी घेतली जात असून त्यासाठी कर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज मिळावे यासाठी केवळ एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

किसान क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये आणि फायदे (Benifits Of kisan credit card)

> किसान क्रेडिट कार्ड हे एखाद्या फिरत्या रोख कर्ज खात्याप्रमाणे असेल.

>> खात्यातील कर्जाच्या उर्वरित रकमेवर बँकेद्वारे बचतीचा व्याजदर लागू केला जाईल.

>> 5 वर्ष कालवधी, वार्षिक परीक्षणआनंतर दरवर्षी 10 टक्के वार्षिक वाढीची मर्यादा.

>> व्याज अनुदान – तत्पर कर्जदारांना 3 लाख रुपयांपर्यंतचे व्याज अनुदान.

>> परतफेड – पिकाच्या कालावधीनुसार (लघु/दीर्घ) परफेडीचा कालावधी आणि पिकाच्या विपणनाचा कालावधी.

>> सर्व पात्र किसान क्रेडिट कार्ड कर्जदारांसाठी रूपे क्रेडिट कार्ड.

>> रूपे कार्डधारकांनी कार्ड 45 दिवसांत सक्रिय केल्यास 1 लाख रुपयांचा अपघाती विमा.

Bank Holidays: पुढील आठवड्यात 5 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

किसान क्रेडिट कार्डसाठीची पात्रता

>> सर्व शेतकरी-वैयक्तिक/संयुक्त कर्जदार, जे मालक आहेत आणि लागवड करतात.

>> भाडेशुल्कावर शेती करणारे शेतकरी, तोंडी पट्टेदार, शेती वाटेकरी.

>> शेतकऱ्यांचा बचतगट किंवा संयुक्त लायबिलिटी समूह, ज्यामध्ये भाडेशुल्कावर शेती करणारे शेतीकरी, शेती वाटेकरी यांचा समावेश असतो.

किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाचा व्याजदर (Interest Rate)

>> 3 लाख रुपयांपर्यंत 7 टक्के.

>> 3 लाख रुपयांपेक्षा जास्त – त्या त्या वेळेनुसार लागू

विमा (Insurance)

>> 70 वर्षांखालील किसान क्रेडिट कार्ड कर्जदार वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत (पीएआयएस) कव्हर होतात.

>> पात्र असलेली पिके प्रधान मंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत (पीएमएफबीवाय) कव्हर होतात.

दिवाळीपर्यंत महागणार LPG Gas Cylinder! जुलै 2021 पासून 90 रुपयांनी वाढले दर

सुरक्षा (Security)

>> प्राथमिक : पिकाचे हायपोथेकेशन

>> तारण – तारण/शेती जमिनीवर ताबा

>> 1.60 लाख रुपयांपर्यंतची किसान क्रेडिट कार्ड मर्यादा

>> कराराअंतर्गत – 3 लाख रुपयांपर्यंतची किसान क्रेडिट कार्ड मर्यादा

एसबीआय किसान क्रेडिट कार्डासाठी कसा अर्ज करावा?

>> एसबीआयवरून अर्ज डाउनलोड करा - https://sbi.co.in/documents/14463/22577/application+form.pdf/24a2171c-9ab5-a4de-08ef-7a5891525cfe

>> शेतकऱ्यांना थेट एसबीआयच्या शाखेला भेट देऊन केसीसी अर्जाचा नमुना घेता येईल.

>> आवश्यक माहिती भरून शाखेमध्ये अर्ज जमा करा.

>> बँक अर्जाचे परीक्षण करेल, अर्जदाराच्या तपशीलाची छाननी करेल व कार्ड मंजूर करेल.

योनो एसबीआयच्या माध्यमातून केसीसीचे परीक्षण (रिव्ह्यू) करण्याची ठळक वैशिष्ट्ये

>> योनो शाखेमध्ये (YONO Branch) किंवा योनो अपद्वारे सफाईदार केसीसी परीक्षण.

>> योनो अपच्या माध्यमातून संपर्कविरहीत आणि कागदपत्रांशिवाय प्रक्रिया

>> योनो शाखेच्या संकेतस्थळावर संपूर्ण प्रक्रिया

>> केसीसी परीक्षण प्रक्रियेचे प्रमाणीकरण

>> शेतकरी आणि शाखेतर्फे कमीत कमी डेटा एंट्री

स्वस्त सोन्यात गुंतवणूक करण्याची उद्या शेवटची संधी, वाचा 10 महत्त्वाचे फायदे

योनोद्वारे केसीसीचे परीक्षण कसे करावे?

>> योनो एसबीआयवर लॉग- इन करा

>> योनो कृषीवर क्लिक करा

>> खाता वर क्लिक करा

>> किसान क्रेडिट कार्डवर क्लिक करा

>> त्यानंतर वैयक्तिक माहिती, जमिनीच्या माहिती, पिकाच्या माहितीची खातरजमा आणि अर्ज दाखल करा

कागदपत्रे (Documents)

>> पत्ता आणि ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी (यापैकी कोणतेही एक)

>> शेती जमिनीची कागदपत्रे

>> अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट आकाराचा फोटो

>> वितरक बँकही पुढच्या तारखेचा धनादेश सुरक्षेसाठी मागू शकते.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाची लिंक - https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card#show

First published:

Tags: Farmer, Loan, Money