मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रेशन कार्डमध्ये नव्या सदस्याचं नाव जोडायचंय? टेन्शन घेवू नका, घरबसल्या करा 'हे' काम

रेशन कार्डमध्ये नव्या सदस्याचं नाव जोडायचंय? टेन्शन घेवू नका, घरबसल्या करा 'हे' काम

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

घरात नवीन सदस्य येताच म्हणजे कुणाचा जन्म झाल्यास वा लग्नानंतर कुटुंबात नवीन सदस्य आल्यास त्यांचे नाव रेशन कार्डवर जोडून (Adding New Member in Ration Card) घेणं गरजेचं आहे.

रेशन कार्ड (Ration Card) हे सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचं कागदपत्र आहे. गरिबांसाठी सुरू असलेली मोफत रेशन योजना आणि इतर अनेक सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असतं. शेतकऱ्यांसाठी असलेल्या किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ घेण्यासाठीदेखील रेशन कार्डची गरज असते. अशा वेळी रेशन कार्डमध्ये (Ration Card importance) घरातल्या सर्व सदस्यांची नावं असणं गरजेचं आहे. घरात नवीन सदस्य येताच म्हणजे कुणाचा जन्म झाल्यास वा लग्नानंतर कुटुंबात नवीन सदस्य आल्यास त्यांचे नाव रेशन कार्डवर जोडून (Adding New Member in Ration Card) घेणं गरजेचं आहे. पूर्वी हे काम करण्यासाठी सरकारी कचेऱ्यांमध्ये जावं लागत होतं; मात्र आता कित्येक राज्यांमध्ये ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑफलाइन पद्धतीने नाव जोडण्याची सुविधा संपूर्ण देशात उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रं एखाद्या लहान मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये (Add new name in Ration Card) जोडायचं असेल, तर घरातल्या मुख्य व्यक्तीचं रेशन कार्ड, संबंधित मुलाच्या जन्माचं प्रमाणपत्र, मुलाच्या आई-वडिलांचं आधार कार्ड, नाव जोडण्यासाठी आवश्यक फॉर्म अशा गोष्टींची गरज असते. तसंच, घरातल्या नवीन सुनेचं नाव (Add wife name in Ration Card) रेशन कार्डमध्ये घेण्यासाठी लग्नाचा पुरावा दाखवणारं कागदपत्र, पतीचं रेशन कार्ड, सुनेच्या माहेरच्या रेशन कार्डमधून तिचं नाव काढल्याचं प्रमाणपत्र आणि पतीचं नाव असलेलं आधार कार्ड या गोष्टींची गरज लागते. ऑफलाइन प्रक्रिया नवीन सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये जोडण्यासाठी अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन एक फॉर्म घ्यावा लागेल. हरियाणासह कित्येक राज्यांमध्ये कोटेदार किंवा डेपोधारकांकडेही हा फॉर्म मिळतो. सर्व माहिती काळजीपूर्वक भरून आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात हा फॉर्म (Update Ration Card offline) जमा करा. अधिकारी तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची सत्यता तपासतात. त्यानंतर तुम्हाला नवीन अद्ययावत रेशन कार्ड मिळतं. (किरकोळ महागाईत मोठी घसरण! सरकारला दिलासा पण सामान्यांना मिळणार का?) घरच्या घरी करा हे काम हे काम ऑनलाइन करण्याची सुविधा आता कित्येक राज्यांमध्ये उपलब्ध आहे. काही टप्प्यांमध्ये तुम्ही रेशन कार्ड अपडेट (Update Ration Card Online) करू शकता. सर्वांत आधी https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx या वेबसाइटवर जा. या ठिकाणी तुम्हाला आधी तुमचा लॉगिन आयडी बनवावा लागेल. यानंतर त्या आयडीने लॉगिन करावं लागेल. या ठिकाणी होम पेजवरच तुम्हाला नवीन सदस्य जोडण्याचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म समोर येईल. यात नवीन सदस्याबाबत विचारलेली माहिती भरा. सोबत आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. हे सर्व झाल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फॉर्म ट्रॅक करू शकता. अधिकाऱ्यांनी फॉर्म आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सर्व गोष्टी बरोबर असल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जातो. त्यानंतर पोस्टाच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड तुमच्या घरी पाठवण्यात येतं. अशा प्रकारे घरबसल्या तुम्ही तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घेऊ शकता.
First published:

Tags: Ration card

पुढील बातम्या